सोळंके आणि पंडित यांच्यावर धस यांची पुन्हा एकदा घणाघाती टीका

सोळंके आणि पंडित यांच्यावर धस यांची पुन्हा एकदा घणाघाती टीका


बीड : प्रकाश सोळंके यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. तर अमरसिंह पंडित दगाबाज असल्याचा पलटवार राष्ट्रवादीतून निलंबित केलेले माजीमंत्री सुरेश धस यांनी रविवारी बीडमध्ये पत्रकार परिषद घेऊन केला. या दोघांच्या मागचा बोलवता धनी वेगळाच असल्याचे सांगत धस यांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांना देखील टोला लगावला. राष्ट्रवादी हा प्रस्थापित मराठ्यांचा पक्ष असून छोट्या मराठ्यांना पक्षात किंमत नसल्याचा खळबळजनक आरोप धस यांनी यावेळी केला. 

केवळ बीडमध्येच राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजपला मदत केली असे नाही. सोलापूर, कोल्हापुरातही हा प्रकार घडला. मग राष्ट्रवादीने फक्त माझ्यावरच कारवाई का केली? या प्रश्‍नाचे उत्तर पक्षाने अजूनही आपल्याला दिलेले नाही. मी कोल्हापूर, सोलापुरातील नेत्यांसारखा कारखानदार, शिक्षणसम्राट नाही म्हणूनच माझ्या एकट्यावर कारवाई केली असा थेट आरोप धस यांनी पक्षश्रेष्ठींवर केला. मुलगा, पत्नी आणि कुटुंबावर जात अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके यांनी माझ्यावर खालच्या स्तराचे आरोप केले. माझ्या वडिलांना लुटारू आणि मला दरोडेखोर व गद्दार म्हणणाऱ्या सोळंकेंच्या वडिलांनी वसंतराव पाटील मुख्यमंत्री असताना आमदार फोडून उपमुख्यमंत्रिपद मिळवले होते. याची आठवण करून देतानाच गद्दारीचा वारसा सोळंकेंना मिळाला आहे. शरद पवार त्यांना पक्षात घ्यायला तयार नव्हते पण मी आग्रह केला म्हणून सोळंके आज राष्ट्रवादीत दिसत आहेत असा दावा धस यांनी केला. 
अमरसिंह पंडितांनी जमिनी हडपल्या 
घरफोड्या, लुटारू अशा शब्दांत धस यांनी आमदार अमरसिंह पंडित यांच्यावर टीका केली. त्यांनी गढी, उमापूर, गेवराईत शासकीय जमिनी हडपल्याचा गंभीर आरोप करतानाच डीसीसी बॅंकेतील भ्रष्टाचार प्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल आहेत त्या अमरसिंहानी माझ्या विषयी बोलणे म्हणजे विजय मल्ल्याने आदर्श बॅंकिंगच्या गप्पा मारण्या सारखे असल्याचे धस यांनी सांगितले. अंगी खानदानी चापलुसपणा आणि धोकेबाजी असलेल्यांनीच पवार आणि मुंडेना धोका दिला. क्षीरसागर यांच्या घरातील गृहकलहाला देखील हेच जबाबदार आहेत. डीसीसी बॅंकेचे 21 कोटी रुपये जय भवानीकडे तर शनिदेव पतसंस्थेकडे 4 कोटींपैकी 1 कोटी रुपये थकीत असल्याचा गौप्यस्फोट देखील धस यांनी पत्रकार 
परिषदेत केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com