आजचा वाढदिवस : आमदार सुरेश धानोरकर - suresh dhanorkar mla | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : आमदार सुरेश धानोरकर

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 मे 2018

विधानसभा निवडणुकीत वरोरा मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेला यश मिळवून देणारे सुरेश धानोरकर कट्टर शिवसैनिक आहेत. विद्यार्थी दशेपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सुरेश धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन उभे केले. जनतेचे प्रश्‍न घेऊन आंदोलन करण्यात ते आघाडीवर होते. डब्ल्यूसीएल व अनेक प्रकल्पाच्या विस्थापितांचे प्रश्‍नही त्यांनी धसास लावले. भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेचा ताबा आहे. भाजप-सेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला होता. परंतु इथून कधीही सेनेचा उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता.

विधानसभा निवडणुकीत वरोरा मतदारसंघातून पहिल्यांदा शिवसेनेला यश मिळवून देणारे सुरेश धानोरकर कट्टर शिवसैनिक आहेत. विद्यार्थी दशेपासून ते शिवसेनेत सक्रिय आहेत. कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सुरेश धानोरकर यांनी वरोरा मतदारसंघात शिवसेनेचे संघटन उभे केले. जनतेचे प्रश्‍न घेऊन आंदोलन करण्यात ते आघाडीवर होते. डब्ल्यूसीएल व अनेक प्रकल्पाच्या विस्थापितांचे प्रश्‍नही त्यांनी धसास लावले. भद्रावती नगर परिषदेवर शिवसेनेचा ताबा आहे. भाजप-सेना युतीमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला होता. परंतु इथून कधीही सेनेचा उमेदवार निवडून येऊ शकला नव्हता. गेल्या निवडणुकीत भाजप-सेना युती तुटल्यानंतर सेनेने धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यांनी माजी मंत्री व भाजपचे उमेदवार संजय देवतळे यांचा पराभव केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख