उद्धव ठाकरेंचे उपकार विसरणार नाही : आमदार सुरेश धानोरकर

शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Uddhav Thakre - Suresh Dhanorkar
Uddhav Thakre - Suresh Dhanorkar

नागपूर :  शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेले उपकार विसरणार नाही, अशा शब्दात शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. गेली पाच वर्षे भाजपने शिवसेनेला योग्य वागणूक दिली नाही. वारंवार शिवसेना नेत्यांचा अपमान करण्याचे काम भाजपच्या नेत्यांनी केले आहे. भाजपने युतीचा धर्म न पाळल्याने या स्थितीमध्ये पुन्हा भाजपसोबत काम करणे शक्‍य नसल्याने आपण कॉंग्रेससोबत जात असल्याची भूमिका शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना मांडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार सुरेश धानोरकर यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात बोलताना धानोरकर म्हणाले, "गेल्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये शिवसेना व भाजपाने एकत्र निवडणूक लढविली होती. केंद्रात सत्ता आल्यानंतर भाजपने आपले रंग दाखविण्यास सुरूवात केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने कोणतेही ठोस कारण न देता शिवसेनेशी युती तोडली. याउपरही शिवसेना नेत्यांनी भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला." भाजपच्या नेत्यांनी शिवसेना नेत्यांनी योग्य प्रकारे वागणूक दिली नाही. शिवसेनेच्या आमदारांचे विकासाचे प्रकल्पही मंजूर केले नाही, असा आरोपही आमदार धानोरकर यांनी केला.

शिवसेनेने आपल्याला खूप काही दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार विनायक राऊत यांनी आपल्याला बरीच मदत केली. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नेहमीच आदराची भावना कायम राहील, असेही आमदार धानोरकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमदार धानोरकर यांचा कॉंग्रेस प्रवेश शुक्रवारपर्यंत लांबला आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मंगळवारला (ता. 5) कॉंग्रेस प्रवेश होता. परंतु त्यांचा कॉंग्रेस प्रवेश आता येत्या 8 मार्चला दिल्लीत होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com