SURESH-DESHMUKH-BIRTHDAY | Sarkarnama

आजचा वाढदिवस : प्रा. सुरेश देशमुख, माजी आमदार, वर्धा विधानसभा मतदारसंघ, जिल्हा वर्धा

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 मे 2019

माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचा जन्म 19 मे 1949 ला सेवाग्राम येथे झाला. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, काही काळ प्राध्यापकीही केली आहे. त्यांचे वडील दादाजी उपाख्य बापूरावजी देशमुख हे स्वातंत्र्य सेनानी होते.

माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांचा जन्म 19 मे 1949 ला सेवाग्राम येथे झाला. त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, काही काळ प्राध्यापकीही केली आहे. त्यांचे वडील दादाजी उपाख्य बापूरावजी देशमुख हे स्वातंत्र्य सेनानी होते.

महात्मा गांधींचे स्थानिक सहकारी म्हणून त्यांनी काम केले. त्यांनी जिल्ह्यात सहकार व शिक्षणाचे जाळे विणले.  शिक्षण व सहकार महर्षी म्हणून त्यांचा आजही गौरवाने उल्लेख केला जातो. तोच वारसा सुरेश देशमुख यांनी पुढे नेला. त्यांनी जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे नेतृत्व केले. राज्य सहकारी मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष म्हणुनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

प्रा. देशमुख एकूण सहा वेळा विधान सभेची निवडणूक लढले; मात्र एकदाच ते निवडून आलेत, 2009 ला. अनेकदा त्यांचा निसटता पराभव झाला. आमदार म्हणून निवडून आल्यावर
त्यांच्याकडे विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सोपविन्यात आली. ते पूर्वी कॉंग्रेस मध्ये होते; शरद पवार कॉंग्रेस मधून बाहेर पडल्यावर ते त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर त्यांना पक्षाचे जिल्हा नेते म्हणून मान्यता मिळाली. ती आजतागायत कायम आहे. पक्षाविषयी जिल्ह्यातील निर्णयात अंतिम शब्द त्यांचाच असतो. 
2014 च्या मोदी लाटेत त्यांचा वर्धा विधान सभेत पराभव झाला; मात्र जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात त्यांचा चाहता वर्ग आहे, वोट बॅंक आहे, हे कुणीही नाकारु शकत नाही. याच पार्श्वभूमीवर त्यांचे सूपुत्र आणि कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुखांकड़े वर्धा लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसकडून आपल्याकडे मागून घेण्याची विनंती केली होती.

येत्या विधानसभा निवडणुकीत वर्धा विधानसभा मतदारसंघ कॉंग्रेसऐवजी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडण्याची जोरदार मागणी देशमुख गटाकडून होणार आहे. त्यावेळी प्रा. सुरेश देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरेल, हे निश्‍चित. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर त्यांचा प्रभाव आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

संबंधित लेख