सुप्रिया सुळेंची 'संवाद यात्रा' मंगळवारी जळगावात 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षातर्फे राज्यात यात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सुरू असलेली 'संवाद यात्रा' मंगळवारी (ता. २७) ला जळगाव जिल्ह्यात येत आहे.
सुप्रिया सुळेंची 'संवाद यात्रा' मंगळवारी जळगावात 

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षातर्फे राज्यात यात्रा सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची सुरू असलेली 'संवाद यात्रा'मंगळवारी (ता. २७) ला जळगाव जिल्ह्यात येत आहे. 

जळगाव जिल्ह्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा कालच रवाना झाली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची 'संवाद यात्रा' येत आहे. 

जळगाव जिल्हयातील चाळीसगाव येथून त्यांच्या संवाद यात्रेला प्रारंभ होणार आहे. मंगळवारी (ता.२७) चाळीसगावात विधीज्ञ, व्यापारी, डॉक्‍टर व व्यवसायिकांशी संवाद साधणार आहेत. बुधवारी (ता. २८) चाळीसगाव तालुक्‍यातील कनाशी येथील श्रीकृष्ण जागृत देवस्थानाचे दर्शन घेतील. याच ठिकाणी पाचोरा येथील पदाधिकारी व कार्यकत्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात येईल.

दुपारी बारा वाजता पारोळा येथे व्यापारी डॉक्‍टर, व्यवसायिकांशी संवाद साधतील, त्यानंतर दुपारी चार वाजता जळगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी बैठक घेवून चर्चा करतील. सायकांळी ६ वाजता रोटरी क्‍लबच्या कार्यक्रमात उपस्थिती असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com