माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब, आज तुम्ही असायला हवे होतात : सुप्रिया सुळेंचे ट्वीट

आज सायंकाळी शिवतीर्थावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या सरकारचा शपथविधी होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हे ट्वीट केले आहे.पवार आणि ठाकरे कुटुंबिय यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे सौ. सुळे यांनी स्व. बाळासाहेब व त्यांच्या पत्नी स्व. मीनाताई यांची आठवण काढली आहे.
NCP Leader Supriya Sule Tweets About Balasaheb And Meenatai Thakrey
NCP Leader Supriya Sule Tweets About Balasaheb And Meenatai Thakrey

मुंबई : माँसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात.तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि रहाल, असे भावनिक ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. 

आज सायंकाळी शिवतीर्थावर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या सरकारचा शपथविधी होत आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हे ट्वीट केले आहे.पवार आणि ठाकरे कुटुंबिय यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यामुळे सौ. सुळे यांनी स्व. बाळासाहेब व त्यांच्या पत्नी स्व. मीनाताई यांची आठवण काढली आहे. 

आज सकाळीच सौ. सुळे यांनी ट्वीट करुन नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा सूर्योदय एका नवा इतिहास रचतोय. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार राज्यात येत आहे.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. देशात महाराष्ट्र पुन्हा एकदा प्रगतीपथावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजण काम करु. अभिनंदन, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नव्या सरकारचे स्वागत केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com