सुप्रिया सुळेंविषयी टिप्पणी करणारास पकडा, अन्यथा चोप देऊ, राष्ट्रवादी महिलांचा इशारा 

सुप्रिया सुळेंविषयी टिप्पणी करणारास पकडा, अन्यथा चोप देऊ, राष्ट्रवादी महिलांचा इशारा 

नाशिक ः राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या फेसबुकवरील फोटोविषयी आक्षेपार्ह कॉमेंट टाकण्यात आली. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला संतप्त झाल्या. थेट पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात धडकलेल्या या महिलांनी यासंदर्भात पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करावा. संबंधीतांस चोविस तासांत अटक करावी अन्यथा कॉमेंट टाकणाऱ्याला धडा शिकवू असा इशारा दिला. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवेदन देण्यात आले. खासदार सुळे यांचे चित्रपट अभिनेत्री करिष्मा कपुर व करिना कपुर यांच्या सोबतचा फोटो फेसबुक अपलोड करण्यात आला होता. त्या फोटोला कमेंट करतांना प्रशांत शेरमाळे नामक तरुणाकडून आक्षेपार्ह टिपणी टाकण्यात आली. 

फेसबुकवर कमेंट पाहताच राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे आणि महिला पदाधिकारींनी तत्काळ पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत यांना भेटून प्रशांत शेरमाळे युवकावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा. त्यास चोविस तासांत अटक करावी अशी मागणी केली. येत्या चोवीस तासात गुन्हा दाखल करून सदर युवकास अटक न झाल्यास राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नासिक शहराच्या महिला त्याला यथेच्छ चोप देतील. असे महिलांनी उपायुक्तांना सुनावले. 

पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे, विभागीय अध्यक्ष सलमा शेख, पुष्पा राठोड, सरिता पगारे, सुरेखा पठाडे, अलका अहिरे, करूणा गाढवे, दिक्षा दोंदे, सुजाता साळवे आदी महिला उपस्थित होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com