सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडला पालखी महामार्गाचा मुद्दा 

दिवे घाटामध्ये श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान उपस्थित केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर म्हटले आहे.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडला पालखी महामार्गाचा मुद्दा 

पुणे - दिवे घाटामध्ये श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यात झालेल्या अपघाताचा मुद्दा लोकसभेत शून्यप्रहरादरम्यान उपस्थित केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटवर म्हटले आहे. 

ट्विट करताना सुळे यांनी म्हटले आहे, की पालखी सोहळ्यात अपघात होणे ही बाब दुःखद असल्याचे नमूद करताना आळंदी-पंढरपूर व देहू-पंढरपूर या पालखी महामार्गाचे काम रखडले असल्याचे सभागृहाच्या लक्षात आणून दिले. या महामार्गासाठी सरकारने निधी दिल्यास हे काम मार्गी लागेल. यामुळे यासाठीचा निधी केंद्र सरकारने तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी आग्रही मागणी सभागृहात केली.

पंढरपूर ते आळंदी कार्तिकी वारीसाठी निघालेल्या दिंडीमध्ये ब्रेक निकामी झालेला जेसीबी घुसून काल मंगळवारी झालेल्या अपघातात दोन वारकरी ठार झाले, तर 24 जखमी झाले आहेत. ठार झालेल्या वारकऱ्यांमध्ये संत नामदेव महाराजांचे 17 वे वंशज सोपान महाराज नामदास यांचा समावेश आहे. या अपघातामुळे पालखी महामार्गाचा मुद्दा पुन्हा एेरणीवर आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com