खासदार सुप्रिया सुळे यांनी घातले पोलिस भरती प्रश्नी लक्ष

प्रथम शारीरिक क्षमता चाचणी (फिजिकल)आणि नंतर लेखी परिक्षा या पोलिस भरतीच्या मुख्य नियमात यावेळी राज्य सरकारने ऐनवेळी बदल केला असून आता पहिल्यांदा लेखी आणि त्यानंतर फिजिकल घेतली जाणार आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील युवकांना बसणार असल्याने त्यांनी याप्रश्नी खासदार सुप्रिया सुळे यांना साकडे घातले आहे.
 खासदार सुप्रिया सुळे यांनी घातले पोलिस भरती प्रश्नी लक्ष

पिंपरी: प्रथम शारीरिक क्षमता चाचणी (फिजिकल)आणि नंतर लेखी परिक्षा या पोलिस भरतीच्या मुख्य नियमात यावेळी राज्य सरकारने ऐनवेळी बदल केला असून आता पहिल्यांदा लेखी आणि त्यानंतर फिजिकल घेतली जाणार आहे. त्याचा फटका ग्रामीण भागातील युवकांना बसणार असल्याने त्यांनी याप्रश्नी खासदार सुप्रिया सुळे यांना साकडे घातले आहे. त्यांनीही हा प्रश्न तरुणांच्या पध्दतीने म्हणजे सोशल मीडियाची मदत घेऊन सोडवण्याचे ठरवले आहे.

दीड महिन्यानंतर राज्य पोलिस दलात मेगा भरती होणार आहे. त्याची तयारी सध्या राज्यभरातील लाखो युवक करीत आहेत. ती सुरू असताना अचानक ऐनवेळी गृह विभागाने भरतीचा महत्त्वाचा नियमच बदलला. आतापर्यंत पहिल्यांदा फिजीकल आणि नंतर लेखी परीक्षा होत होती. त्याऐवजी आता प्रथम लेखी आणि नंतर फिजीकल घेतली जाणार आहे. हा बदल आपल्या मूळावर येणारा असल्याचे लक्षात येताच या भरतीची तयारी करणारे काही लाख तरुण हादरून गेले. त्यांनी सुप्रिया ताईंकडे आपली कैफियत पोचवली. त्यावर आज सकाळी आठ वाजताच त्या लगेच मदतीला धावून आल्या. 

पुणे येथील सणस मैदानावर पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या युवकांची त्यांनी भेट घेतली. गोंधळलेल्या या मुलांना त्यांनी शांत आणि आश्वस्त केले. 

एेनवेळी नियमातील हा बदल चुकीचा असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच पूर्वीप्रमाणेच ही भरती करावी,यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह सचिवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भरतीची तयारी करणाऱ्या राज्यभरातील तरुणांनी याप्रश्नी मुख्यमंत्र्यांना ऑनलाईन अपिल करावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सोशल मीडियातून (फेसबुक)हा बदल रद्द करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांना करा,असे त्या म्हणाल्या. आर. आर. आबा आज असते, तर ही वेळच आली नसती, या शब्दात त्यांनी आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, तुम्ही सराव, तयारी सुरू ठेवा, भरतीचे व बदललेल्या नियमाचे मी बघते, असे या मुला-मुलींना आश्वस्त करीत त्या भोर, वेल्ह्याच्या नियोजित दौऱ्यावर रवाना झाल्या.

दरम्यान, या बदलामुळे ग्रामीण भागातील युवक डावलला जाणार असल्याची तक्रार यावेळी सुप्रियाताईंकडे करण्यात आली. या पदासाठी बौद्धिक क्षमतेच्या तुलनेत शारीरिक फिटनेस अधिक महत्त्वाचा आणि गरजेचा असल्याचे त्यांना सांगण्यात आले. तर,यामुळे शहरी भागातील तरुणच अधिक प्रमाणात भरती होतील,अशी भीतीही ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांनी यावेळी व्यक्त केली. तर बारावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता असलेल्या या पोलिस भरतीला पदवीधर सुद्धा आता उतरुन ते पहिली फेरी पास होतील. त्याचा फटका आम्हाला बसेल, असे गावाहून आलेल्या या तरुणांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com