दबावतंत्राचा वापर करून पक्षांतरे करून घेतली जात आहेत : सुप्रिया सुळे

दबावतंत्राचा वापर करून पक्षांतरे करून घेतली जात आहेत : सुप्रिया सुळे

परभणी : सीबीआय, ईडी, बॅंक व कारखाने यांची भिती दाखवून पक्षांतर करून घेतले जात आहे. कोण कुठे चालले याची चिंता आम्ही करत नाही कारण आमचा पक्ष दबावतंत्राचा वापर कधीच करत नाही असे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. शारदा महाविद्यालयात शहरातील डॉक्‍टर्स, वकील, व्यापारी व प्राध्यापकांशी त्यांनी संवाद साधला. 

यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ.फौजिया खान, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, उपाध्यक्षा भावना नखाते, सोनाली देशमुख, प्रा.किरण सोनटक्के आदीची प्रमुख उपस्थिती होती. खासदार सुळे म्हणाल्या, देश अस्थिरतेकडे झुकत आहे. जीएसटी, नोटाबंदीसह सरकारने गेल्या पाच वर्षात राबविलेल्या आर्थिक धोरणाचा परिणाम सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये दिसून येवू लागला आहे, असा आरोप त्यांनी केला. 

संवाद दौ-याच्या निमित्ताने समाजातील विविध स्तरातील व्यावसायिकांशी चर्चा करून ग्राऊँड रियालटी समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सध्या आर्थिक मंदी व त्यातून निर्माण होत असलेली बेरोजगारी हे प्रश्‍न गंभीर रूप धारण करीत आहेत. याला कारण सरकारच्या मल्टीपल मेकींग पॉलीसीच कारणीभूत आहेत. एकीक़डे पैसा आहे म्हणून सांगणारे सरकार रस्त्याचे कामे मात्र पूर्ण करू शकत नाहीत. 

त्या पुढे म्हणाल्या, हजारों शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार कोट्यावधी रूपयाच्या जाहिरातबाजीतच अडकून पडले आहे. जनतेकडून कराच्या रुपाने वसूल झालेला पैसा हा जाहिरातबाजीवर उधळला जात आहे. जाहिरातबाजी करायची असेल तर संघटनेच्या पैशातून करावी, असे खा. सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला लागलेल्या गळतीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, भाजपमध्ये जाणारी मंडळी केवळ चार कारणामुळेच प्रवेश करीत आहेत. ईडी, सीबीआय, बॅंक व डबघाईस आलेले कारखाने आदी कारणामुळेच ही मंडळी पक्षांतर करीत आहेत. परंतू मतदारांच्या दृष्टीने ही बाब अत्यंत घातक ठरणारी आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com