वडील 50 वर्षे लढले, तेच निवडणुकीत आठवत होते - सुप्रिया सुळे

वडील 50 वर्षे लढले, तेच निवडणुकीत आठवत होते - सुप्रिया सुळे

पुणे - `श्रमलेल्या बापाची लेक नारळाचं पाणी/
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी' असं सांगत `लोकसभेच्या निवडणुकीत बारामतीतून लढताना वडील 50 वर्षे लढले, तेच सारे आठवत होते,' असे खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

गुरुपौर्णिमेनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुळे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

खासदार सुळे  म्हणाल्या, ``निवडणुकीसाठी बाबांनी कानमंत्र दिला नाही. परंतु मार्गदर्शन केले. प्रयत्न आपण स्वतः करायचे असतात. मतदारांसमोर प्रचार करताना मी केलेले काम मांडले.''

वडिलांकडून मिळणाऱ्या सल्ल्याविषयी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या, ``संसदेच्या आठ-दहा पायऱ्या चढताना बारामतीच्या लोकांशी असलेली नाळ/नातं कायम लक्षात ठेव. ज्या दिवशी हे नातं किंवा नाळ विसरशील तेव्हा या पायऱ्या चढू शकणार नाही, हा त्यांनी दिलेला पहिला सल्ला. लोकसभेत बसणारा प्रत्येक खासदार काही ना काही कर्तृत्व करूनच आलेला असतो. त्यामुळे प्रत्येक खासदाराचे बोलणे गांभीर्याने घ्यायचे. महत्त्वाचे असेल, अभ्यास असेल तरच सभागृहात बोलायचे, हा त्यांनी दिलेला दुसरा सल्ला आहे.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com