सुप्रिया सुळेंनी मारला झुणका भाकरीवर ताव

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील प्रसिद्ध झुणका भाकर केंद्राला भेट दिली आणि झुणका भाकरीचा आस्वाद घेतला. 59 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघटनासाठी त्या आल्या होत्या.
NCP Leader Supriya Sule Took Zunka Bhakari Meal at Vardha
NCP Leader Supriya Sule Took Zunka Bhakari Meal at Vardha

वर्धा : राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी येथील प्रसिद्ध झुणका भाकर केंद्राला भेट दिली आणि झुणका भाकरीचा आस्वाद घेतला.  59 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उदघटनासाठी त्या आल्या होत्या.

अधिवेशन स्थळावरुनच सुप्रिया सुळे यांच्याकड़ून झुणका भाकर केंद्राचे संचालक संजय तिगांवकर यांना सुप्रियाताई जेवण करायला येणार असल्याचा निरोप देण्यात आला. येथील मगन संग्रहालय चौकातील तिगांवकर झुणका भाकर केंद्र सर्वदूर प्रसिद्ध आहे. सुप्रिया सुळे वर्ध्याला आल्या की त्या आवर्जून येथील झुणका भाकरीचा आस्वाद घेतात. सुप्रियताई आल्या आणि त्यांनी झुणका भाकरसह पूरण पोळीचाही आस्वाद घेतला. 

या दरम्यान गप्पाचाही फड रंगला. चक्क सुप्रियताई झुणका भाकर केंद्रात आल्याने अनेक ग्राहकांनी त्यांची भेट घेतली, फोटो काढून घेतले. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत आदींची उपस्थिती होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com