मॉंसाहेब आणि आदरणी बाळासाहेब...! तुम्ही दोघे आज असायला हवे होतात, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 

मॉंसाहेब आणि आदरणी बाळासाहेब...! तुम्ही दोघे आज असायला हवे होतात, सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 

पुणे : मॉंसाहेब आणि आदरणीय बाळासाहेब...! आज तुमची खुप आठवण येतेय. हे सर्व पहायला तुम्ही दोघे असायला हवे होतात. तुम्हा दोघांनी मला मुलीपेक्षाही जास्त प्रेम दिले. तुम्ही माझ्या आयुष्यात स्पेशल होता,आहात आणि राहाल अशी भावनिक पोस्ट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्‌विटवर केली आहे. 

राज्यात आजपासून ठाकरे सरकार सत्तेवर येत आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे हे सरकार असणार आहे. विशेष म्हणजे पवार आणि ठाकरे कुटुंबांचे राजकारणापलिकडचे नाते होते. पवार आणि ठाकरे राजकीय शत्रू मानले जात मात्र या दोघांनी राजकारणा पलिकडे जाणून नेहमीच मैत्री जपली. सुप्रिया सुळे यातर नेहमीच मातोश्रीवर जात असत.

उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरे या त्यांना मुलीसारख्या मानत. बाळासाहेब आणि मीनाताईचे पुत्र उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत. अशावेळी त्यांचा हा शपथविधी पाहण्यास हे दोघेही असायला हवे होते असे सुप्रिया सुळेंना वाटते. 
त्यांना बाळासाहेब आणि मीनाताईंची आठवण झाल्याने त्यांनी ही भावनिक पोस्ट टाकली आहे  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com