भाजप सरकार 'धनगर आरक्षण' देणार नाही : सुप्रिया सुळे 

सुळे यांनी जामखेड येथील राकेश व योगेश राळेभात यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. तालुक्‍यातील गुंड प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे, असे सांगून सुळे म्हणाल्या, राळेभात कुटुंबियांच्या समवेत राष्ट्रवादी कॉग्रेस कायम उभी राहिल.
भाजप सरकार 'धनगर आरक्षण' देणार नाही : सुप्रिया सुळे 

नगर : धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजप सरकार उदासिन आहे. हे सरकार आरक्षण देणार नाही. केवळ खोटं बोलण्याची ते भूमिका करतात, अशी टीका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. 

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी (ता. जामखेड) येथे सुळे यांनी अभिवादन केल्यानंतर त्यांनी भाजप सरकारविषयी नाराजी व्यक्त केली. या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, महिला आघाडी अध्यक्षा मंजूषा गुंड, युवा आघाडी अध्यक्षा अमृता कोळपकर तसेच नेते उपस्थित होते. 

सुळे म्हणाल्या, आरक्षणासाठी आवाज उठविणारे सूर्यकांत कांबळे, रवी देशमुख,  इंद्रकुमार भिसे यांना जिल्हाबंदी करण्यात आली. हा कुठला न्याय आहे. ही मुस्कटदाबी आहे. हे सरकारचे अपयश आहे. 

धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत आपण संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणाबाबत प्रस्ताव केंद्राकडे पाठविला नसल्याचे सांगितले. या वरून धनगर आरक्षणाबाबत सरकार किती उदासिन आहे, हे स्पष्ट होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com