'रेंज' नसल्याने अजितदादा 'नाॅट रिचेबल'

आज सकाळपासून अजित पवार 'नाॅट रिचेबल' असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. मात्र, ते नाराज नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Ajit Pawar in not Angry with Party Claims Supriya Sule
Ajit Pawar in not Angry with Party Claims Supriya Sule

मुंबई : उपमुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार नाराज असल्याची अफवाच असल्याचे या पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. आम्ही एकत्रच असून सध्या ज्या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणी रेंज नसल्याने 'नाॅट रिचेबल' असल्याचे त्यांनी सांगितले. सायंकाळी आम्ही एकत्रच शपथविधीला जाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. 

आज सकाळपासून अजित पवार 'नाॅट रिचेबल' असल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. मात्र, ते नाराज नाहीत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री पद कुणाकडे असेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. अजित पवार यांना हे पद द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, आज सकाळपासून अजित पवार कुणालाही भेटलेले नाहीत.

राज्य मंत्रीमंडळाची गृहमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री किंवा ही दोन्ही पदे राष्ट्रवादीच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या बद्दल सन्मान आहेच, मात्र अजित पवार यांच्याही कामाची दखल घेतली जावी, अशी मागणी समर्थक करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जे सर्वोच्च पद येईल, ते अजित पवार यांना मिळावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com