सरकार आमचेच येणार : सुप्रिया सुळे

बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघसाठी आज सुळे यांनी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि कुटुंबियांसह मतदान केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.
Supriya Sule After Voting in Baramati
Supriya Sule After Voting in Baramati

पुणे : बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबियांसह मतदान केले. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस - काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघसाठी आज सुळे यांनी त्यांच्या आई प्रतिभा पवार आणि कुटुंबियांसह मतदान केले. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

पुढे त्या म्हणाल्या की, ''आज बारामतीत आम्ही सगळे मतदानासाठी आलो आहोत. राष्ट्रवादीने कायम विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत. त्यामुळे मला विजयाची खात्री आहे.  ईडीच्या कारवाईचा कोणताही परिणाम झालेला नाही. भाजपचे दिगग्ज मंत्री आणि पदाधिकारी प्रचारासाठी आले यावरून कोणाचे पारडे जड आहे, हे लक्षात आले असेलच.'' यावेळी त्यांनी पावसाची तमा न बाळगता लोकांनी मतदान करावे असे आवाहन केले. बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासमोर भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com