supriya sule birhday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार सुप्रिया सुळे

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 30 जून 2019

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अभ्यासु खासदार म्हणून राज्यात ओळख आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या अशी त्यांची राज्यात ओळख असली तरी त्यांनी आपल्या कारकिर्दीतून स्वतःचा राजकीय प्रभाव तयार केला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून 2009, 2014 आणि 2019 या तीन निवडणुकांतून त्या विजयी झाल्या. या आधी त्या राज्यसभेच्या खासदार होत्या.

महिला, अपंगांसाठीचे धोरण, भटक्या विमुक्यांचे प्रश्न यात त्यांनी जाणीवपूर्वक लक्ष घातले. राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या संघटना वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. लोकसभेत विविध विषयांवरील भाषणे वाखाणली गेली. आपल्या मतदारसंघातील 25 हजारांहून अधिक विद्यार्थिनींना सायकल वाटण्याच्या त्यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख