सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे टाॅवरवर चढलेला युवक उतरला खाली

मराठा आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील मळद येथील अमोल भापकर हा युवक आज पहाटेपासूनच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील महावितरणच्या टॉवरवर चढून बसला होता. सकाळी सव्वानऊच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी आल्या. त्यांनी या युवकाला विनंती केल्यानंतर अमोल भापकर खाली उतरला आणि प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला.
सुप्रिया सुळेंच्या मध्यस्थीमुळे टाॅवरवर चढलेला युवक उतरला खाली

बारामती : मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी बारामतीचा एक युवक भिगवण रस्त्यावरच्या महावितरणच्या टाॅवरवर चढून बसल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः विनंती केल्यानंतर हा युवक खाली उतरला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मराठा आरक्षणासह इतरही मुद्यांवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील वागण्याची गरज आहे, सर्व महत्वाच्या या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केली. 

मराठा आरक्षणासह इतरही मागण्यांसाठी बारामती तालुक्यातील मळद येथील अमोल भापकर हा युवक आज पहाटेपासूनच बारामती शहरातील भिगवण रस्त्यावरील महावितरणच्या टॉवरवर चढून बसला होता. सकाळी सव्वानऊच्या सुमारास खासदार सुप्रिया सुळे घटनास्थळी आल्या. त्यांनी या युवकाला विनंती केल्यानंतर अमोल भापकर खाली उतरला आणि प्रशासनानेही सुटकेचा निःश्वास टाकला. 

या नंतर पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी आरक्षणाच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी संवेदनशील वागावे अशी अपेक्षा व्यक्त करत तातडीने निर्णय प्रक्रीया राबविण्याची मागणी केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व इतर मंत्री असंवेदनशील बोलतात, ही गोष्ट युवकांच्या मनाला लागते, त्या मुळे सर्वच जबाबदार मंत्री व इतरांनीही कोणत्याही समाजाबद्दल चुकीचे विधान करु नये, आज वातावरण कसे आहे याची सर्वांनाच जाणीव आहे त्या मुळे सर्वांनीच शांततेने राहावे असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांनी या विषयात जातीने लक्ष घालून निर्णय घ्यायला पाहिजे असे जाता जाता त्यांनी आवर्जून नमूद केले. 

सुप्रिया सुळे यांच्या मध्यस्थीने युवकाचे समाधान
मराठा आरक्षणासाठी अमोल भापकर स्वातंत्र्यदिनी भल्या पहाटेच महावितरणच्या टॉवरवर चढून बसला होता. या घटनेने पोलिस, महसूल सर्वच प्रशासनाची झोप उडाली होती. सर्व मित्र व प्रमुखांनी विनंती करुनही अमोलचे मन वळविण्यात ते अयशस्वी ठरत होते शेवटी खासदार सुप्रिया सुळे यांना विनंती केल्यावर त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली आणि अमोलला स्वताः विनंती केली. सुळे यांची विनंती मान्य करुन शेवटी अमोल खाली उतरला व सुप्रिया सुळे यांच्या आश्वासनानंतर तीन तास सुरु असलेले हे नाट्य संपुष्टात आले. 

मुख्यमंत्र्यांच्या विधानाविषयी नाराजी
दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासमवेत चर्चा करताना अमोल भापकर यांनी मुख्यमंत्र्यांनी साप सोडण्याचे विधान करुन तसेच नोक-या कुठे आहेत असे विधान करुन नितीन गडकरी यांनी मराठा समाजाला बदनाम केल्याची नाराजी व्यक्त केली. आरक्षण मिळालेच पाहिजे, असेही भापकर म्हणाला. 

अन सुप्रिया सुळे रस्त्यावरच बसल्या
अमोल भापकर याच्याशी चर्चा करण्याचे ठरल्यावर सुप्रिया सुळे टॉवर शेजारी असलेल्या रस्त्यावरच मांडी घालून खाली बसल्या. अमोल टॉवरवरुन खाली उतरेपर्यंत त्या खाली बसून होत्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com