तर तो वंशाचा दिवा काय कामाचा ?  सुप्रिया सुळेंचा दलबदलूंना टोला 

supriya_sule
supriya_sule

जळगाव :   पंचाहत्तर  वर्ष वयाच्या बापाला आपल्या राजकारणाच्या यशासाठी दुसऱ्याच्या दारात हात जोडावयास लावत असेल तर तो वंशाचा दिवा  काय कामाचा?  त्यामुळे आम्ही लेकी बऱ्या आम्ही आमच्या बापावर ती वेळ येवू देणार नाही,  असा टोला पक्षबदल करणाऱ्या कोणत्याही नेत्याच नाव न घेता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला. 

संवाद यात्रेच्या निमित्ताने त्या गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात आहेत. जळगाव येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्या बोलत होत्या.

त्या म्हणाल्या, काही जण आज पुत्र प्रेमापोटी पक्षबदल करीत आहेत. मात्र हे दुर्दैवी आहे. राजकारणात यश मिळविण्यासाठी पुत्र आज पंचाहत्तर वर्षाच्या बापाला दुसऱ्याच्या दारात हात जोडण्यासाठी पाठवित असतील ते तो वंशाचा काय कामाचा? त्यापेक्षा आम्ही लेकी बऱ्या, आम्ही आमच्या  बापाला या वयात कधीच कोणापुढे हात जोडावयाच पाठविणार नाही. 

भाजपच्या दबावाच्या बाबतीत बोलतांना त्या म्हणाल्या, भीती , दहशत आणि पैशाच बळ आज आम्हाला दाखविल जात आहे. मात्र तेच उद्या जनतेलाही दाखविल जाईल. त्यामुळे आता यांच्या विरूध्द संघर्ष आम्ही करणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com