सुप्रिया सुळे -अजितदादा सिल्व्हरओकवरून एकत्र शपथविधीला जाणार

 सुप्रिया सुळे -अजितदादा सिल्व्हरओकवरून एकत्र शपथविधीला जाणार

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल नॉट रिचेबल असल्याने पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या मात्र नाराजी वैगेरे काही नसूून सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचा फोन वरून संपर्क झाल्याचे समजते. अजितदादा संध्याकाळी साडेपाच वाजता सिल्वर ओकवर येणार आहेत. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे अजितदादा प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या बंड राज्यात चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत परतले ते उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊनच. या सर्व घडामोडीनंतर आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना नेत्यांच्या पुन्हा बैठका झाल्या होत्या. खाते वाटपही फायनल झाले आहे. 

आज सांयकाळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ शिवतीर्थावर घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे एकत्र जाणार आहेत. संध्याकाळी अजितदादा सिल्व्हर ओकवर जाणार असल्याची माहिती आहे. दादा पुन्हा नॉट रिचेबल झाल्याने ते पुन्हा नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्रीपद कोणाला द्यायचे यावरून मतभेद असल्याचे वृत्त होते मात्र सर्वकाळी सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com