supriya sule | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

फडणवीस "कॉपीकॅट' मुख्यमंत्री - सुप्रिया सुळे

संपत देवगिरे
शनिवार, 22 एप्रिल 2017

नाशिक : प्रफुल्ल पटेल यांनी केंद्रात मंत्री असताना दहा वर्षे त्यांनी कधी लाल दिवा वापरला नव्हता. आम्ही रांगेत उभे राहतो. बॉडी गार्डस्‌ बाळगत नाही. मारामा-या करीत नाही. पण या साधेपणाचा कधी प्रचार केला नाही. लाल दिवा काढल्याचा ढोल बडवणा-या मुख्यमंत्र्यांनी दिवा काढून त्याची जाहिरात करण्यापेक्षा वृत्तीने साधे व्हावे. लाल दिव्यापेक्षाही कर्जमाफी अधिक महत्त्वाची आहे. ती करावी असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केले. 

पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्याशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या, ""देवेंद्र फडणवीस हे कॉपी कॅट मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडे स्वतःचे काहीही नाही. केंद्रातले मुख्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे बोलतील त्याची नक्कल करण्यात ते धन्यता मानतात. त्यात ओरिजनल काहीच नसते. अन्यथा विरोधी पक्षनेता ते मुख्यमंत्री या दोन वर्षात एखादी व्यक्ती एव्हढी कशी बदलू शकते? 

लाल दिवा काढल्याने व्हीआयपी कल्चर संपत नाही. सत्ताधारी वृत्तीने व्हीआयपी आहेत. आमच्या सरकारच्या काळातही शेतकऱ्यांच्या-यांच्या आत्महत्या झाल्या. मात्र सध्याच्या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे रेकॉर्ड झालेय तरी ते कर्जमाफी करीत नाहीत. शेवटी राज्यातल्या किती आया- बहिणींचे कपाळ पांढरे झालेले यांना पहायचे ही तरी जाहीर करावे. एव्हढा क्रूर राजकीय खेळ फडणवीस यांनी खेळू नये. तो थांबवावा व कर्जमाफी करावी अशी मागणीही त्यांनी केली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख