छगन भुजबळ वैजापूरमधून लढणार? 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्‍याने विजयी होत विकासकामांचा डोंगर उभा करुन दुष्काळी येवला मतदारसंघाचा चेहरा, मोहरा बदलला. मात्र आता राज्यातील राजकीय चित्र बदलले. वैजापुर येथील कार्यकर्त्यांनी त्यांना विकासासाठी वैजापुरमधून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे.
 छगन भुजबळ वैजापूरमधून लढणार? 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सलग तीन वेळा मोठ्या मताधिक्‍याने विजयी होत विकासकामांचा डोंगर उभा करुन दुष्काळी येवला मतदारसंघाचा चेहरा, मोहरा बदलला. मात्र आता राज्यातील राजकीय चित्र बदलले. वैजापुर येथील कार्यकर्त्यांनी त्यांना विकासासाठी वैजापुरमधून उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे. दोन दिवसांनी ते भुजबळांची भेट घेणार आहेत. त्यामुळे भुजबळ यंदा येवल्यातून नव्हे तर मराठवाड्यातील वैजापुर मतदारसंघाचे भावी आमदार असतील, अशा पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्या आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ सलग तीन टर्म येवल्याचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. मात्र, यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व भुजबळांचे निकटवर्तीय माणिकराव शिंदे यांनी पक्षाने आपल्याला विधान परिषदेवर नियुक्तीचे आश्‍वासन दिले होते. ते पुर्ण झालेले नाही. त्यामुळे आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भुजबळ यांच्या दौऱ्यात निवेदन देऊन त्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. शिवसेनेने संभाजी पवार यांना उमेदवारीचे संकेत दिले आहेत.

पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत यांसह विविध उमेदवार शिवसेनेत इच्छुक आहेत. बदललेली राजकीय स्थिती लक्षात घेता रिस्क टाळण्यावर भुजबळ यांच्या समर्थकांचा आग्रह दिसतो. त्यामुळे वैजापुर येथील ज्येष्ठ नेते मनोज घोडके, बाळासाहेब शिंदे, पुंडलीक गायकवाड यांनी सोशल मिडीयावर आवाहन करीत भुजबळ अथवा माजी खासदार समीर भुजबळ यांनी वैजापुर मतदारसंघातून उमेदवारी करावी, असा मतदारांचा आग्रह असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारी (ता.12) सकाळी अकराला हे नेते, समर्थक, मतदार येवला येथे भुजबळ यांची भेट घेणार आहेत. 

वैजापुरच्या नेत्यांचे आवाहन सोशल मिडीयावर प्रसारीत होताच वैजापुरचे भावी आमदार म्हणून छगन भुजबळ, समीर भुजबळ यांची छायाचित्रे असलेल्या पोस्ट व्हायरल झाल्या. वैजापुर मतदारसंघ येवला मतदारसंघाच्या सीमेवर मात्र औरंगाबाद जिल्ह्यात येतो. त्याचा मराठवाड्यात समावेष होतो. त्यामुळे भुजबळ यांनी मतदारसंघ बदलल्यास येवल्यातून राष्ट्रवादीला पर्यायी उमेदवार अथवा भुजबळ यांच्या संमतीने उमेदवार द्यावा लागेल. वैजापुरमुळे मराठवाड्याचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com