support Modi, Fadnvis, Danve : Vijay Chaudhari | Sarkarnama

मोदी , फडणवीस आणि दानवेंचे हात मजबूत करा :  विजय चाैधरी

सरकारनामा
मंगळवार, 31 जुलै 2018

केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण व शहरी भागात पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब  दानवे यांचे हात बळकट करावेत.

जालना: केंद्र व राज्य शासनाच्या कल्याणकारी योजना ग्रामीण व शहरी भागात पोहोचवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब  दानवे यांचे हात बळकट करावेत. राज्यात 36 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी भाजपा सरकारने दिली, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशाचा विकास झपाट्याने सुरू आहे, असे प्रतिपादन भाजप  अोबीसी मोर्चाचे  प्रदेशाध्यक्ष विजय चाैधरी यांनी मंगळवारी येथे केले . 

भाजप आेबीसी मोर्चाच्या पदाधिकार्यांची  श्री.चाैधरी यांनी संवाद से संपर्क अभियानतर्गंत मंगळवारी (ता.31) येथे बैठक घेऊन मार्गदर्शन केले. अोबीसी मोर्चाचे संवाद से संपर्क अभियान हे नागपूर येथून सुरू झाले आहे.केंद्र व राज्यशासनाच्या वतीने  अोबीसीच्या कल्याणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.त्या त्यांच्या पर्यंत पोहचविणे हा अभियानाचा उदेश आहे.  

  विजय चाैधरी की,  " राज्यातील ओबीसी समाजाच्या काय समस्या आहेत व काय अडचणी आहेत यांच्या आराखडा तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे   यांच्याकडे द्यावा.  ते या समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी तयार आहेत. ओबीसीसाठी भाजपा सरकारने विश्वकर्मा सन्मान योजना राबविण्यात येत असून कामगारांनी त्याचा लाभ घ्यावा ."

यावेळी अशोक पांगारकर प्रदीप पांडे ,सरचिटणीस देविदास देशमुख यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन  सुनील पवार यांनी केले तर आभार अमरदीप शिंदे यांनी मानले.कार्यक्रमास भाजप ओबीसीचे पदाधिकारी रविंद्र कायंदे, दगडूबा गोरे, गणेश नरवडे, योगेश विधाते, जायभाये, संतोष वाघ, संजय पोफळे, रामेश्वर सोनावणे, संजय डोंगरे, बद्री वाघ, सुहास मुंढे, रोषण चौधरी, नामदेव नागवे, आदींची उपस्थिती होती.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख