support to maratha samaj ramdas athawale | Sarkarnama

मराठा समाजाच्या आरक्षणाला  पाठिंबा :आठवले

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

मुंबई : मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्यात यावे, ही मागणी आपण सर्वप्रथम लोकसभेत केली होती, त्या मागणीवर आपण ठाम असून मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा असल्याची ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केवळ राज्यसरकारने कायदा करणे पुरेसे नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात ग्राह्य व्हावे, यासाठी संसदेत आराक्षणाची मर्यादा 50 टक्‍क्‍यांहून वाढवून 75 टक्के करणारा कायदा करणे आवश्‍यक आहे. देशभरातील मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जाट, गुज्जर आदी सवर्ण जातीतील आर्थिक दुर्बलांना स्वतंत्र प्रवर्ग करून 25 टक्के आरक्षण देणारा कायदा संसदेत संमत करावा,

अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे यासाठी आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतही आग्रह धरला होता असेही त्यांनी म्हटले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख