अभिनेता सनी देओल विजयी झाल्याने पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा 

 अभिनेता सनी देओल विजयी झाल्याने पंजाब कॉंग्रेसच्या अध्यक्षांचा राजीनामा 

चंदिगड ः लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व अभिनेते सनी देओल यांच्याकडून हार पत्करावी लागल्यानंतर पंजाब कॉंग्रेसचे प्रमुख सुनील जाखड यांनी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पदाचा राजीनामा सोमवारी सोपविला. 

"निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनील जाखड यांनी पदाचा राजीनामा राहुल गांधी यांच्याकडे सोपविला असल्याचे जाखड यांच्या सहकाऱ्याने सांगितले. ""राहुल गांधी, प्रियांका गांधी-वद्रा आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांसारख्या कॉंग्रेसच्या वरिष्ठांनी पाठिंबा देऊनही मी माझी जागा राखू शकलो नाही. 

गुरुदासपूर मतदारसंघात ऑक्‍टोबर 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत जाखड यांनी विजय मिळविला होता. भाजपचे खासदार विनोद खन्ना यांच्या निधनानंतर या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com