नागपूर जिल्हा युवक काँग्रेसवर आमदार सुनील केदार यांचा झेंडा  - Sunit Kedar Factions wins Nagpur Youth Congress Chief post | Politics Marathi News - Sarkarnama

नागपूर जिल्हा युवक काँग्रेसवर आमदार सुनील केदार यांचा झेंडा 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

गेल्या काही दिवसांपासून युवक काँग्रेसच्या निवडणुकीने नागपूर शहर व जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याने नागपूर शहर अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचा निकाल मात्र आज जाहीर करण्यात आला. यात आमदार सुनील केदार गटाने जिल्हा युवक काँग्रेसवर वर्चस्व कायम राखले आहे. 

नागपूर : सावनेरचे आमदार सुनील केदार गटाने नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकून जिल्ह्यातील काँग्रेसमधील विरोधकांवर मात केली आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी सावनेरचे राहुल सिरीया निवडून आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून युवक काँग्रेसच्या निवडणुकीने नागपूर शहर व जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रियेत गोंधळ झाल्याने नागपूर शहर अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा युवक कॉंग्रेसचा निकाल मात्र आज जाहीर करण्यात आला. यात आमदार सुनील केदार गटाने जिल्हा युवक काँग्रेसवर वर्चस्व कायम राखले आहे. 

नागपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदासाठी आमदार सुनील केदार यांनी मोर्चेबांधणी केली होती. परंतु, दिल्लीतून राजेंद्र मुळक यांना पसंती दिल्यापासून सुनील केदार नाराज होते. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे विरोधक म्हणूनही आमदार केदार ओळखले जातात. युवक काँग्रेसच्या निवडणुकीत मात्र आमदार केदार यांनी पक्षातील विरोधकांवर मात केल्याचे बोलले जात आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी केदार गटाचे राहुल सरीया व नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचे सुपुत्र अनुराग भोयर यांच्यात लढत होती. 

यात सिरीया यांनी 2073 मते घेऊन विजय संपादन केला. दुसऱ्या क्रमांकाची मते घेणाऱ्या अनुराग भोयर यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नागपूर जिल्हा युवक काँग्रेसच्या महासचिवपदी अमोल केणे यांची निवड झाली. काटोल विधानसभा अध्यक्षपदी पदम डेहनकर, हिंगणा विधानसभा अध्यक्षपदी अश्‍विन बैस यांची निवड झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख