आमदार सुनील शेळकेंचा भाजपला आणखी एक धक्का

मावळ तालुक्यात सुनील शेळकेंनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले आहे...
sunil shelake gives jolt to bjp
sunil shelake gives jolt to bjp

वडगाव मावळ : वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापतीच्या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आल्याने गुरुवारी (ता.21) झालेल्या निवडणुकीत सर्व सहा विषय समित्यांच्या सभापतिपदी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे या महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले. भाजपला एकही सभापतिपद न मिळाल्याने धक्का बसला. गतवेळेस भाजपकडे तीन विषय समित्यांचे सभापतिपद होते.

नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी गुरुवारी नगरपंचायतीत विशेष सभेचे आयोजन केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष राहुल ढोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत सहापैकी चार विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध व दोन विषय समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले

स्वच्छता वैधक, आरोग्य समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत आघाडीचे राजेंद्र कुडे यांनी भाजपचे दशरथ केगले यांचा एका मताने तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीच्या निवडणुकीत चंद्रजित वाघमारे यांनी भाजपचे किरण म्हाळसकर यांचा एका मताने पराभव केला. शिक्षण व क्रीडा समिती सभापतीच्या निवडणुकीत मनसेच्या सायली म्हाळसकर यांच्या अर्जावर सूचक व अनुमोदक समान असल्याने भाजपचे गटनेते दिनेश ढोरे यांनी हरकत घेतली. परंतु, निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळल्याने म्हाळसकर विजयी झाल्या.

विषय समित्या वत्सांचे नवनिर्वाचित सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे - सार्वजनिक बांधकाम समिती - पूनम जाधव (सभापती), सदस्य- दिनेश ढोरे, दिलीप म्हाळसकर, माया चव्हाण, प्रमिला बाफना.

शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती - सायली म्हाळसकर (सभापती), सदस्य - अर्चना म्हाळसकर, दिलीप म्हाळसकर, प्रमिला बाफना, पूजा वहिले.

पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समिती- राहुल ढोरे (सभापती), सदस्य - अर्चना म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले.
नियोजन व विकास समिती- चंद्रजित वाघमारे (सभापती), सदस्य - किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले.
स्वच्छता वैधक व आरोग्य समिती ः राजेंद्र कुडे (सभापती), सदस्य- दशरथ केंगले, अर्चना म्हाळसकर, प्रमिला बाफना, माया चव्हाण.
महिला व बालकल्याण समिती ः शारदा ढोरे (सभापती), सदस्य- दीपाली मोरे, सुनीता भिलारे, प्रमिला बाफना, माया चव्हाण.
निवडीनंतर फटाके वाजवून आनंद साजरा केला. नगरसेवक सुनील ढोरे, राजेश बाफना, अमर चव्हाण, विशाल वहिले, शरद ढोरे, प्रवीण ढोरे आदींच्या उपस्थितीत नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com