तिरोड्यातून सुनील मेंढेंना 50 हजारांचा लीड मिळेल : आमदार विजय रहांगडाले

तिरोडा - गोरेगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार सुनील मेंढे यांचा जोमात प्रचार केला. उन्हाची तमा बाळगली नाही. मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे या मतदारसंघात सुनील मेंढे 50 हजारांच्या लिडने पुढे राहतील, असे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.
तिरोड्यातून सुनील मेंढेंना 50 हजारांचा लीड मिळेल : आमदार विजय रहांगडाले

गोंदिया : तिरोडा - गोरेगाव विधानसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार सुनील मेंढे यांचा जोमात प्रचार केला. उन्हाची तमा बाळगली नाही. मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे या मतदारसंघात सुनील मेंढे 50 हजारांच्या लिडने पुढे राहतील, असे आमदार विजय रहांगडाले यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून मी आपला मतदारसंघ बळकट करण्याला प्राधान्य दिले. प्रत्येक गावांत बुथप्रमुख तयार केले. बूथ कमिटी नेमल्या. या कमिटीच्या माध्यमातून सदस्य व कार्यकर्त्यांनी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्रात जोमाने प्रचार केला, अक्षरशः जिवाचे रान केले. मी स्वतः प्रचारात उतरलो. डोअर टू डोअर प्रचार केला. मतदारांनीही चांगलाच प्रतिसाद दिला. त्यामुळे भंडारा- गोंदिया लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुनील मेंढे आपल्या मतदारसंघातून 50 हजार इतकी लीड घेतील. त्यांचा विजय निश्‍चित असल्याचे मी ठामपणे सांगू शकतो, असे आमदार रहांगडाले म्हणाले. 

विजय रहांगडाले यांची आमदारकीची ही दुसरी टर्म आहे. त्यांना विजयाची हॅटट्रीक करायची आहे. त्यामुळे आगामी विधानसभा
निवडणुकीची तयारीही त्यांना यातून केली. 3 एप्रिलला पंतप्रधान मोदी यांची सभा गोंदियाला झाली. त्यामुळे चांगली वातावरण निर्मीती झाली आणि स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झाला. त्याचा फायदा निकालात
निश्‍चितपणे दिसणार आहे. विरोधकांना ही निवडणूक जातीयतेकडे नेण्याचे पूर्ण प्रयत्न केले. पण सुज्ञ मतदारांना त्यांचे मनसुबे वेळीच ओळखल्यामुळे विरोधक यात यशस्वी झाले नाहीत. नियमित आणि शिस्तबद्ध केलेल्या प्रचारामुळे आमचा विजय निश्‍चित आहे, असे रहांगडाले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com