भाजपच्या जिल्हाध्यक्षांना धुळ चारुन कॉंग्रेसचे सुनील केदार सावनेरमध्ये विजयी

सावनेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार 20 हजार 227 मतांनी विजयी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांचा त्यांनी पराभव केला.
भाजपच्या जिल्हाध्यक्षांना धुळ चारुन कॉंग्रेसचे सुनील केदार सावनेरमध्ये विजयी

नागपूर : सावनेर विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार 20 हजार 227 मतांनी विजयी झाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांचा त्यांनी पराभव केला.

सावनेरचे किंग समजले जाणारे सुनील केदार यांच्यविरुद्ध संघटनेचे कौशल्य असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने ही लढत भाजपसाठी प्रतिष्ठेची झाली होती. केदार यांनीही या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावले होते. डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देऊन भाजपने खेळलेला "ब्लाईंट गेम' त्यांचे राजकारणातील भविष्य ठरविणारा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यांचा सावनेर मतदारसंघातील कळमेश्‍व येथे पोहचल्यावर डॉ. राजीव पोतदार यांना आशीर्वाद देण्याचे आवाहन केले होते. तेव्हापासून डॉ. पोतदार यांची बाजू उमेदवारीसाठी मजबूत झाली होती. ते 2004 पासून भाजपकडे उमेदवारीसाठी तगादा लावत होते. मध्यंतरी युतीमध्ये सावनेरची जागा शिवसेनेला द्यावी अशी मागणी करून खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुख्यमंत्र्याचे लाडके असलेल्या पोतदारांवर त्यांचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसले नव्हते. यातच सिल्लेवाडा येथे स्टार बससेवेच्या उद्‌घाटनाचा वाद भाजपच्या पथ्यावर पडला. पोतदार यांची उमेदवारी निश्‍चित होण्याचा मार्गही मोकळा झाला. तेव्हापासूनच सावनेरची लढत ही केदार यांच्यासाठी सोपी नसेल असे चित्र दिसू लागले होते.

सावनेरच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या केदार यांनी ही बाब अचूक हेरली. कॉंग्रेसच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने त्यांचे कॉंग्रेसमधील वजनही वाढल्याचे समोर आले. शिवाय भाजपवरही दबाव वाढविण्यात ते यशस्वी ठरले. उमदवारी अर्ज दाखल करताना सावनेरमध्ये जमलेली केदार समर्थकांची गर्दी त्यांच्या वर्चस्वाची पावती देणारी होती. यामुळे भाजपच्या गोटात धडकी भरली. केदार यांनी आक्रमकपणे प्रचार केला. तेवढी आक्रमकता भाजप दाखविण्याचा प्रयत्न केला. पण तो फसला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com