sunil kedar gets responsibility of pune congress | Sarkarnama

सुनील केदार त्यांच्या डॅशिंग स्वभावाप्रमाणे पुण्याची काॅंग्रेस हलविणार का?

उमेश घोंगडे
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

पुणे : डॅशिंग नेता अशी प्रतिमा असलेले राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्याकडे कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद देण्यात आले आहे. संघटनवाढीच्या प्रयत्नाचा भाग म्हणून कॉंग्रेसच्यावतीने आज जिल्हानिहाय या जबाबदाऱ्यांची घोषणा करण्यात आली. केदार यांच्याकडे पालकमंत्री म्हणून वर्धा जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र, संघटनेच्या पातळीवर त्यांच्याकडे पुण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

पुण्यातील काॅंग्रेसची अवस्था सध्या गलितगात्र आहे. पुण्यावर या पक्षाची कधीकाळी सत्ता होती. आधी राष्ट्रवादीच्या ताकदीपुढे आणि आता भाजपच्या बांधणीमुळे पक्षाची पिछेहाट झाली. सर्व शहरावर प्रभाव पडेल, असे नेतृत्त्व सध्या पक्षात नाही. कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण करण्याचे काम केदार यांनी प्रथम करावे लागणार आहे.

सत्तेच्या काळात पक्ष संघटना अधिक मजबूत व्हावी. त्यातून पक्षाचा विस्तार वाढवण्याची जबाबदारी या संपर्कमंत्र्यांवर सोबविण्यात आली आहे. जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात या नेत्यांनी सततचा संपर्क ठेवणे अपेक्षित आहे. मुंबई व ठाणे वगळता इतर मंत्र्यांकडे दोन किंवा तीन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.

संपर्क मंत्रीपदाच्या जिल्हानिहाय जबाबदाऱ्या : बाळासाहेब थोरात (नगर,नाशिक), अशोक चव्हाण (परभणी, बीड, जालना), नितीन राऊत (अकोला, वाशिम), विजय वडेट्टीवार (गडचिरोली, यवतमाळ, रायगड), यशोमती ठाकूर (बुलढाणा, गोंदिया), अमित देशमुख (औरंगाबाद, उस्मानाबाद), वर्षा गायकवाड (मुंबई उपनगर), अस्लम शेख (ठाणे), के. सी. पाडवी (धुळे, जळगाव, पालघर), सतेज पाटील (सातारा, सिंदुदूर्ग, रत्नागिरी) विश्‍वजीत कदम (सांगली, सोलापूर)
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख