सलामत रहे दोस्ताना हमारा! देशमुख, केदार पाचव्यांदा आमदार

नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कामठीतून टेकचंद सावरकर व उमरेडमधून राजू पारवे यांना प्रथमच विधासभा सदस्य होण्याची संधी मिळाली आहे. समीर मेघे यांनी सलग दुसरा विजय मिळविला असून आशिष जयस्वाल चौथ्यांदा तर सुनील केदार व अनिल देशमुख पाचव्यांदा विधानसभेत पोहचले आहेत.
सलामत रहे दोस्ताना हमारा! देशमुख, केदार पाचव्यांदा आमदार

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सहा जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. कामठीतून टेकचंद सावरकर व उमरेडमधून राजू पारवे यांना प्रथमच विधासभा सदस्य होण्याची संधी मिळाली आहे. समीर मेघे यांनी सलग दुसरा विजय मिळविला असून आशिष जयस्वाल चौथ्यांदा तर सुनील केदार व अनिल देशमुख पाचव्यांदा विधानसभेत पोहचले आहेत.

पाचव्यांदा विधानसभेत पोहचणाऱ्या अनिल देशमुख व सुनील केदार यांच्यात बरेच साम्य आहे. दोघांना एक-एक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. 1995 साली जिल्हा परिषदेचे सदस्य असलेल्या अनिल देशमुख व सुनील केदार यांनी अपक्ष आमदारकीची निवडणूक लढविली होती. दोघांनीही त्यावेळचे कॉंग्रेसचे उमेदवारांना धुळ चारली होती. सुनील केदार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख तर अनिल देशमुख यांनी सुनील शिंदे यांना पराभूत केले. यानंतर दोन्ही नेत्यांच्या नशिबी विजय आला नाही हे विशेष. 1995 साली युती सरकारमध्ये दोघांनाही मंत्री पदे मिळाली. 1999 साली राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची स्थापना झाल्यावर दोन्ही नेते राष्ट्रवादीत सामील झाले. राष्ट्रवादीकडून सावनेरमधून लढलेल्या सुनील केदार यांना भाजपच्या देवराव आसोले यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला.

अनिल देशमुख यांनी विजय मिळविला. सतत चारवेळा आमदार होण्याचा मान अनिल देशमुख यांना मिळाला. मागील 2014 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपचे आशिष देशमुख यांनी पराभव केला होता. तर 2004 साली पुन्हा अपक्ष लढून सुनील केदार यांनी विजय मिळविला. त्यानंतर ते सलग चार वेळा आमदार झाले. 2014 च्या मोदी लाटेतही केदार विजयी ठरले होते. तर अनिल देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. या निवडणुकीत सहाव्यांदा विधानसभा लढणाऱ्या या दोन्ही नेत्यांचे भविष्य ठरविणारी ही निवडणूक होती. दोघांनी एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल केला हे ही विशेष. यात दोन्ही नेत्यांनी बाजी मारली आहे. म्हत्वाचे म्हणजे अनिल देशमुख व सुनील केदार यांच्या विरोधात डॉ. आशिष देशमुख यांनी भाजपकडून निवडणूक लढविली आहे. सध्या ते कॉंग्रेसमध्ये आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com