sunil kedar and ankita | Sarkarnama

पालकमंत्री केदार यांचा अंकीताच्या आदरांजलीसाठी 12 तासांचा उपवास...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये अंकीता पिसुट्टेला माथेफीरु युवकाने जाळले. नागपुरात सात दिवस उपचार केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही महाराष्ट्राच्या काही भागांत महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतच राहिल्या. महिलांवरील वाढत्या हिंसक हल्ल्याच्या विरोधात वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी डॉ. आंबेडकर चौकात अंकीताला श्रद्धांजली, आत्मचिंतन यासाठी 12 तासांचा सामुहिक उपवास केला. 

आज सकाळी 8 वाजता उपवासाला सुरुवात झाली असून रात्री 8 वाजता संपणार आहे. केदारांच्या या उपवासात वर्धेतील कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही सहभागी झाले आहेत. अंकीता पिसुट्टेच्या मृत्युच्या घटनेची चर्चा थांबण्याआधीच काल सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघात महिला डॉक्‍टरांवर ऍसीड हल्ल्याची घडना घडली. तेथे तणावाचे वातावरण झाले होते. 

विविध उपाययोजना करुनही महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबत नसल्यामुळे लोक व्यथित झाले. त्यामुळे आज आत्मचिंतन करुन उपवास ठेवण्यात आला आहे. पालकमंत्री केदार यांच्यासमवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शारदा केने, कॉंग्रेसच्या वीणा दाते, सुरेश ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य संजय शिंदे, कुंदा भोयर, कौशल्या लढी, प्रतिभा ठाकूर, भंते नागित बोधी, पुरुषोत्तम डोंगरे, हेमलता मेघे, अनिल फरसोले, सपना शिंदे, सुकेशनी अनवीज, शरयु वांदिले, सपना परीहाल, महेंद्र शिंदे, प्रा. निरंजन ब्राम्हण, गजानन येळवटकर, विजय नरांजे, नंदू कांबळे आदी आजच्या श्रद्धांजली व उपवास कार्यक्रमात सहभागी झाले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख