आमदार सुनील कांबळे यांच्या नावे आगळ्या-वेगळ्या इतिहासाची नोंद

आमदार सुनील कांबळे यांच्या नावे आगळ्या-वेगळ्या इतिहासाची नोंद

पुणे : स्थायी समितीचे अध्यक्ष होऊनदेखील महापालिकेचे अंदाजपत्रक मांडण्याची संधी न मिळालेले अध्यक्ष असा इतिहास आमदार सुनील कांबळे यांच्या नावावर नोंदला जाणार आहे. या वर्षीच्या मार्च महिन्यात सुनील कांबळे यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कॅन्टोन्मेनट मतदारसंघातून त्यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी मिळाली. निवडणुकीत ते निवडून आले. आमदार झाल्याने पक्षाने त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला सांगितला. 

स्थायी समितीचे अंदाजपत्रक दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात मांडण्यात येते. या फेब्रुवारी महिन्यात कांबळे अंदाजपत्रक मांडणार होते. मात्र, आमदार झाल्याने पक्षाच्या आदेशामुळे त्याआधीच त्यांना पायउतार व्हावे लागले. कांबळे हे सलग पाचवेळा महापालिकेत निवडून आले. स्थायी समितीचे अध्यक्ष होण्यासाठी त्यांना अनेक वर्षे वाट पाहावी लागली होती. मात्र, स्थायीचे अध्यक्ष झाल्यानंतर सहा महिन्यातच त्यांच्याकडे आमदारकी चालून आली. एकाचवेळी दोन पदे आल्याने त्यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाचा त्याग करावा लागला. पुणे महापालिकेत भाजपाला बहुमत आहे. पक्षाचे 99 नगरसेवक आहेत. त्यामुळे बहुमताची पक्षाला अडचण नाही. मात्र, पक्षातील बहुतांश नगरसेवक सध्या नाराज आहेत. यात निवडणुकीच्या काळात कॉंग्रेस-राष्ट्रवादीतून आलेल्या नगरसेवकांचा समावेश आहे. आपल्याला काहीच विचारले जात नाही. कोणत्याही पदाला संधी दिली जात नाही हे नाराजीमागचे कारण आहे. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com