Sunanda Pawar Happy As Rohit Pawar Mentioned Her name in Assembly | Sarkarnama

रोहित यांनी विधीमंडळात केलेला नांवाचा उल्लेख सुखावह : सुनंदा पवार

मिलिंग संगई
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

रोहित पवार या पवार कुटुंबियातील तिस-या पिढीने आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेताना रोहित सुनंदा राजेंद्र पवार अशी सुरवात केल्याने साहजिकच सर्वांच्याच कौतुकाचा तो विषय ठरला. या बाबत सुनंदा पवार यांच्याकडे विचारणा केल्यानंतर हा सुखद धक्का होता, अशा शब्दात त्यांनी त्याचे वर्णन केले. 

बारामती शहर : इतर प्रत्येक ठिकाणीच नांव घेताना वडीलांच्याच नावाचा उल्लेख होतो, आज मात्र आपल्या जीवनाची वेगळी सुरवात करताना रोहितने आठवणीने माझ्या नावाचा उल्लेख केल्याने मला खूप बरं वाटल...आपल्या मुलाने एका महत्वाच्या क्षणी आपली आठवण ठेवून नावाचा उल्लेख करणे, ही गोष्ट मला समाधान देणारी ठरली, अशा शब्दात सुनंदा पवार यांनी आपल्या भावना बोलून दाखविल्या.

रोहित पवार या पवार कुटुंबियातील तिस-या पिढीने आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेताना रोहित सुनंदा राजेंद्र पवार अशी सुरवात केल्याने साहजिकच सर्वांच्याच कौतुकाचा तो विषय ठरला. या बाबत सुनंदा पवार यांच्याकडे विचारणा केल्यानंतर हा सुखद धक्का होता, अशा शब्दात त्यांनी त्याचे वर्णन केले. 

मुलाच्या जडणघडणीत आईचे स्थान नेहमीच वेगळे असते, पण मुलाने आठवण ठेवून त्याचा उल्लेख विधीमंडळात करण्याने मला खूप छान वाटले. इतर वेळेस नाव घेताना वडीलांच्याच नावाचा उल्लेख होतो, पण रोहितने अत्यंत आवर्जून माझा उल्लेख केला हे खूप वेगळे होते, असेही सुनंदा पवार म्हणाल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख