माझ्या कामाचे कौतुक केल्याने सुमित्रा महाजनांचे तिकिट भाजपने कापले : सुप्रिया सुळे

माझ्या कामाचे कौतुक केल्याने सुमित्रा महाजनांचे तिकिट भाजपने कापले : सुप्रिया सुळे

वालचंदनगर : निवडणुका आल्या की पवारांवरती टीका करुन ते वाईट असल्याचे सांगायचे आणि निवडणुका संपल्या की  पवार चांगले असल्याचे सांगून त्यांच्या कामांचे कौतुक करायचे, असा विराेधकांचा फंडा असून विरोधक दुतोंडी असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

मी लोकसभेमध्ये केलेल्या कामाचे कौतुक सभापती सुमित्रा महाजन यांनी  केल्यामुळे त्यांचे तिकिट कापले असल्याचा खळबळजनक आरोप भाजपवरती  खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे  आयोजित केलेल्या प्रचारसभेमध्ये बोलत होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, पावणेपाच वर्षे पवार कुटुंबाचे कौतुक करायचे. देशामध्ये बारामतीसारखा इतर शहरांचा विकास झाला पाहिजे असे सांगून पवारांचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगतात. निवडणुका  जवळ आल्यानंतर पवारांवरती टीका करण्याचे काम विरोधक करीत आहे.

``भाजप सरकार हे संविधान बदलण्याची भाषा करीत आहे. मात्र राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस पक्ष असेपर्यंत संविधनामध्ये बदल करुन देणार नाही. मोदी सरकारच्या काळामध्ये शेती, उद्योग व व्यापार अडचणीमध्ये आला आहे. सर्वसामान्य नागरिकांचे  महागाईमुळे कंबरडे मोडले आहे. मुख्यमंत्रयांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीमध्ये धनगर आरक्षण देण्याचे कबूल केले होते. मात्र कॅबिनेटच्या २१६ बैठका झाल्यातरी आरक्षण दिले नाही. भारतीय कंपन्यांना डावलून परदेशी कंपन्यांना भारतीमध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिल्यामुळे भारतातील उद्योगधंद्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कामगार कायदे बदलून कामगारांचे संसार उद्धवस्त करण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव असल्याचे सांगितले. 

यावेळी आमदार दत्तात्रेय भरणे, सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ माने,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, उपसभापती यशवंत माने, संचालक दत्तात्रेय फडतरे, इंदापूर तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष  कृष्णाजी यादव, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे आदी उपस्थित होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com