गोंधळ घालून धनगर आरक्षण मिळणार नाही : सुमित्रा महाजन 

गोंधळ घालून धनगर आरक्षण मिळणार नाही : सुमित्रा महाजन 

जामखेड (जि. नगर) : "काय वर्णू हो तुमच्या चौंडी गावचे कौतुक, आलो द्याया धन्यवाद. दिली लेक गुणवंत, प्रजेची ओ झाली माय. कर्तत्वाची सुनबाई दातृत्वाला नाही पार, कीर्ती सुगंधाने भरला सारा आसमंत." अशी चोंडी गावावर व आहिल्यादेवी होळकर यांच्यावरील कविता सादर करून लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी उपस्थितांचे मन जिंकले. 

पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती उत्सवानिमित्त चौंडी (ता.जामखेड) येथे आज अयोजित कार्यक्रमात महाजन बोलत होत्या. अध्यक्षस्थानी जेष्ठ आमदार गणपतराव देशमुख होते.तर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पालकमंत्री प्रा.राम शिंदे होते. या वेळी माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, आनंदराव देवकाते, माजीमंत्री बबनराव पाचपुते ,खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार भीमराव धोंडे, दत्तात्रेय भरणे, अदिंसह कार्यकर्ते उपस्थितीत होते. 

सध्या धनगर व धनगड या शब्दांमध्ये हा प्रश्न अडकला आहे. याबाबत खासदार डॉ. विकास महात्मे व अन्य तज्ञ्‌जन मंडळी अभ्यास करीत आहेत. ही प्रक्रीया पूर्ण झाली, की आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आरक्षणाला आपला विरोध नाही, पण गोंधळ घालून, पत्रके जाळून ते मिळणार नाही, त्यासाठी लोकसभेत बहुमताने बील पास व्हावे लागेल, असे स्पष्टीकरण लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले 

स्वागताध्यक्ष पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले," चौंडीचा दिवसेंदिवस विकास होतोय. माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांचे मिळणारे योगदान महत्वाचे आहे. दरवर्षी आपण चौंडीला येतो.आहिल्यादेवीचे आशिर्वाद घेतो.त्यामुळे आपल्याला मोठे बळ मिळतो. आहिल्यादेवी आपला अभिमान आहे. विश्वास आहे. अस्मिता आहे.समाजाचे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत.यापैकी आरक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे. आपण हा प्रश्न मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्या माध्यमातून सोडून घेतल्याशिवाय राहणार नाहीत." 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com