sule`s selfie with pot holes makes impact | Sarkarnama

सुप्रिया सुळेंच्या खड्ड्यांच्या सेल्फीचा बांधकाम विभागाला धसका

मिलिंद संगई
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

बारामती शहर : खासदार सुप्रिया सुळे यांच्या "सेल्फी विथ खड्डा' या मोहिमेचा सार्वजनिक बांधकाम विभागाने धसका घेतला आहे. बारामती विभागात जवळपास सर्वच रस्त्यांच्या डांबरीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या मोहिमेची दखल घेत अधिकाऱ्यांना केवळ खड्डे बुजवू नका, रस्त्याचे व्यवस्थित पूर्ण लांबीचे डांबरीकरण करा, अशी सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मोरगाव-बारामती-कळंब-बावडा-नीरा नरसिंहपूर हा हायब्रीड ऍन्युइटी योजनेंतर्गत रस्ता मंजूर झाला आहे. त्यासाठी 290 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या रस्त्याची निविदा निश्‍चिती झाली असून, या महिनाअखेरीस काम सुरू होणार आहे.
 
जेजुरी-मोरगाव-सुपे-चौफुला हा रस्ता अष्टविनायक मार्ग प्रकल्पात समाविष्ट असून, त्यासाठी 184 कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. हे कामही या महिनाअखेरीस सुरू होईल. गतवर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर असलेली बारामती तालुक्‍यातील रस्त्यांची सात कामे अंतिम टप्प्यात असून, त्याद्वारे सुमारे 137 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण होणार असल्याची माहिती बांधकाम विभागाचे अभियंता विश्वास ओहोळ यांनी दिली.
 
यंदाच्या अर्थसंकल्पात उपविभागातील सर्व रस्त्यांना डांबरीकरणासाठी मंजुरी मिळाली असून, त्यात 24 रस्त्यांची कामे आहेत. या सर्व कामांच्या निविदानिश्‍चिती प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहेत व महिनाअखेरीस काम सुरू होईल, असेही ओहोळ म्हणाले.

पावसाळ्यानंतर डिसेंबरअखेरपर्यंत बारामती उपविभागातील 160 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले असून, त्या दृष्टीने नियोजन झाले आहे, असेही ते म्हणाले. मुख्य अभियंता प्रवीण किडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र रहाणे व कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख