sulbha ubale ex corporator | Sarkarnama

आजचा वाढदिवस : सुलभा उबाळे, माजी नगरसेविका. शिवसेना शहर महिला संघटक. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 मार्च 2018

सुलभा उबाळे या पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या आक्रमक नेत्या आहेत. सध्या त्या शिवसेनेच्या शहर महिला संघटिका आहेत. तीनवेळा त्या नगरसेविका होत्या. दहा वर्षे त्या पालिकेत शिवसेनेच्या गटनेत्या होत्या. दोन वेळा स्थायी समितीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही त्यांनी पार पाडलेली आहे. 1997 ला त्या प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महिला असूनही महिला राखीव प्रभागाऐवजी खुल्या प्रभागातून त्या निवडून येत होत्या. पालिका सभागृहात विरोधी नगरसेवकाची भूमिका त्या अभ्यासू आणि आक्रमकपणे मांडत होत्या.

सुलभा उबाळे या पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या आक्रमक नेत्या आहेत. सध्या त्या शिवसेनेच्या शहर महिला संघटिका आहेत. तीनवेळा त्या नगरसेविका होत्या. दहा वर्षे त्या पालिकेत शिवसेनेच्या गटनेत्या होत्या. दोन वेळा स्थायी समितीत सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही त्यांनी पार पाडलेली आहे. 1997 ला त्या प्रथम नगरसेविका म्हणून निवडून आल्या. महिला असूनही महिला राखीव प्रभागाऐवजी खुल्या प्रभागातून त्या निवडून येत होत्या. पालिका सभागृहात विरोधी नगरसेवकाची भूमिका त्या अभ्यासू आणि आक्रमकपणे मांडत होत्या. 2009 आणि 2014 ची विधानसभा निवडणूकही त्यांनी लढविली होती पण त्यांना त्यात अपयश आले. बचत गट महासंघ ही संकल्पना त्यांनी शहरात आणली. गेल्यावर्षी झालेल्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. तरी त्या पूर्वीच्याच तडफेने कार्यरत आहेत.  

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख