विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी सुजितसिंह ठाकूर जवळपास नक्की

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव जवळपास नक्की झाले आहे. ठाकुर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.
सुजितसिंह ठाकूर
सुजितसिंह ठाकूर

पुणे : विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेपदासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव जवळपास नक्की झाले आहे. ठाकुर यांच्या नावाची अधिकृत घोषणा आज किंवा उद्या होण्याची शक्यता आहे.

पक्षातील विश्वसनीय सूत्रानी दिलेल्या महितीनुसार ठाकूर यांच्या नावाला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी संमती दिली आहे. या पदासाठी पक्षातील अन्य नावांची चर्चा झाली. मात्र, पक्ष नेतृत्वाने ठाकूर यांच्या नावाला अधिक पसंती दिल्याचे सूत्रानी  सांगितले. 

विरोधी पक्षनेत्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील मेळावा, त्याची राज्यभर झालेली चर्चा यामुळे ठाकूर यांच्या निवडीचा विषय मागे पडला होता. पक्षातील नाराजांचा रोख फडणवीस यांच्याकडे असला तरीही या पदासाठी फडणवीस यांचे विश्वासू असलेले ठाकूर यांचीच पक्षाने निवड केली असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

दरम्यान, एकनाथ खडसे व पंकजा मुंडे यांनी पक्ष नेत्यावर केलेल्या जाहीर टीकेमुळे पक्ष नेतृत्व या दोघांवर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com