माझ्या पराभवासाठी झटणाऱ्यांनो विधानसभेची तयारी करू नका : सुजय विखेंचा इशारा

माझ्या पराभवासाठी झटणाऱ्यांनो विधानसभेची तयारी करू नका : सुजय विखेंचा इशारा

नगर ः सुजयने घेतलेला निर्णय योग्य ठरला. व्यक्तिगत पातळीवर आलेल्या प्रचाराला जिल्ह्यातील सुज्ञ मतदारांनी आजच्या निकालाने उत्तर दिले. (स्व.) बाळासाहेब विखे यांच्या नातवाचे खासदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले,'' अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पुत्र डॉ. सुजय यांच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.

 महायुतीच्या झालेल्या विजय मेळाव्यात विखे पाटील बोलत होते. विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी मंत्री अनिल राठोड व बबनराव पाचपुते, अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व विखे समर्थक उपस्थित होते. पालकमंत्री शिंदे, राठोड, पाचपुते, औटी, बेरड, गाडे, आगरकर आदींचीही भाषणे झाली. 
 
विधानसभेची तयारी करू नका 
""मला पराभूत करण्यासाठी अनेकांनी पडद्यासमोरून व पडद्यामागून प्रयत्न केले. मात्र, जनतेने "त्यांना' जागा दाखवून दिली. विरोध करणाऱ्यांनी व विरोधाचा आदेश देणाऱ्यांनी आगामी विधानसभेची तयारी करू नये. सुजय म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील नाहीत,'' असा टोला डॉ. सुजय यांनी विरोधकांना लगावला. 
 
वडिलांनी भाजपमध्ये यावे 
वडील राधाकृष्ण विखे पाटील यांना उद्देशून डॉ. सुजय विखे म्हणाले, ""आपण कॉंग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केले; मात्र त्या पक्षातील काही नेत्यांनी आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला. आजच्या निकालातून जनतेनेच "त्यांना' संपविले. त्यामुळे आगामी काळात आपण भाजपमध्ये प्रवेश करावा.'' 
 
"मानस' आजोबांमुळेच खासदार! 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याबाबत बोलताना डॉ. विखे म्हणाले, ""खासदारकीचे तिकीट मागण्यासाठी मी या दोघांकडे गेले होतो. मात्र, त्यांनी ऐन वेळी मला डावलल्याने, योग्य वेळी योग्य पक्षात आलो. "मानस' आजोबा व "मानस' काका यांनी मला विरोध केला नसता, तर कदाचित आज मी खासदार झालोच नसतो.''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com