sujay vikhe in trouble on that statement | Sarkarnama

सुजय विखेंना `ते वक्तव्य` भोवणार? कर्जतमधील भाषण अंगलट येण्याचा धोका

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

संगमनेर ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खात्यावर वर्ग केलेले दोन हजार रुपये शेतकऱ्यांना चालतात. मग भाजपचे चिन्ह असलेले कमळ का नको, असे वक्तव्य करणाऱ्या खासदार डॉ. सुजय विखे यांना संगमनेरमधील तरुण शेतकऱ्यांनी रजिस्टर पोस्टाने दोन हजार रुपयांचे धनादेश पाठविले. विखे यांच्या वक्तव्यावरुन शेतकऱ्यांत संतापाची लाट असून, त्याचा निषेध करण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी आज हे पाऊल उचलले.

खासदार विखे यांनी नुकतेच भाजपचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित एका सभेत वरील वक्तव्य केले होते. मतदान करायचे नसेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या खात्यावर सरकारने जमा केलेले मदतीचे दोन हजार रुपये परत करावेत, अशी जाहीर भूमिका मांडली होती. त्याचवेळी विखे सोशल मीडियात टीकेचे धनी झाले होते. त्या वक्तव्याचा निषेध करीत आज संगमनेरमधील शेतकऱ्यांनी दोन हजार रुपयांचे धनादेश रजिस्टर पोस्टाने विखे यांच्या घरच्या पत्त्यावर पाठविले आहेत. त्यासोबत विखे यांच्या निषेधाचे पत्रही जोडले आहे.

विखे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या मतांची किंमत दोन हजार रुपये करत त्यांच्या मताच्या अधिकाराचा अपमान केल्याचा दावा तरुण शेतकऱ्यांनी केला आहे. त्याबद्दल संतापही व्यक्त करत विखे प्रचार करतील, त्या कोणत्याच उमेदवाराला मतदान करु नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख