मी बाळासाहेब थोरातांचा फोटो घरात लावणार : सुजय विखे 

..
Vikhe -Thorat
Vikhe -Thorat

संगमनेर (नगर) :  "लोकसभेला भाजपची उमेदवारी मिळून मला खासदार व वडिलांना मंत्री व्हायला आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रयत्न आहेत. त्यांचा फोटो मी घरात लावणार आहे,'' असा उपरोधिक टोला खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.


महायुतीचे उमेदवार साहेबराव नवले यांच्या प्रचारासाठी घास बाजारात आयोजित प्रचारसभेत विखे पाटील बोलत होते. ते म्हणाले, "पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी येथील थोरात विरोधकांना एकत्र करण्याचा अशक्‍य प्रयोग आम्ही केला. तेही सर्व मतभेद विसरून एकत्र आले. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही परिवर्तन होणार आहे. स्व-कष्ट व स्व-कर्तृत्वातून नवले यांनी सामाजिक स्थान निर्माण केले. गेल्या 30 वर्षांपासून पालिकेत सत्ता असताना, शुद्ध पाणी, सांडपाण्याची व्यवस्था व रस्त्याचा प्रश्न न सोडविणारे आता विकासाच्या गप्पा मारत कोणत्या आधारावर मतदान मागतात?''


"विकास कसा असतो, हे पाहण्यासाठी शेजारच्या शिर्डी मतदारसंघात जा. तसाच चमत्कार येथेही घडू शकतो. त्यासाठी फक्त एकदा परिवर्तनाची हिंमत दाखवा. संगमनेर तालुका विकासासाठी दत्तक घेतो,'' अशी ग्वाही देत डॉ. विखे पाटील म्हणाले, "राज्यात 150 जागा येण्याचे स्वप्न पाहणारे प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात फक्त तीन जागांवर उमेदवार उभे करू शकले. वाळूतस्करी, लॅंडमाफिया आणि ठेकेदारी प्रवृत्तीमुळे बरबटलेल्या आघाडीतील पक्षांना जनता कंटाळली आहे. "ईडी'च्या माध्यमातून त्यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागणार आहेत. आगामी दोन वर्षांत त्यांची भेट घेण्यासाठी तुरुंगात जावे लागेल.'' 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com