सुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार... - sujay vikhe meets amit shah to help corona patients IN pravara hospital | Politics Marathi News - Sarkarnama

सुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार...

मुरलीधर कराळे
शुक्रवार, 20 मार्च 2020

...

नगर ः कोरोना विषाणुशी सामना करण्यासाठी पद्मश्री डाॅ. विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. आज दिल्ली येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार विखे पाटील यांनी शहा यांची भेट घेवून प्रवरा ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी केली.

"कोरोना'पासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने तातडीने घेतलेल्या निर्णयांबद्दल विखे पाटील यांनी अभिनंदन केले आणि आभार मानले. साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन प्रवरा परिवाराच्या वतीने शहा यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात "कोरोना'मुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.  

संबंधित लेख