माझ्या संकटाच्या काळात आधार देण्याचे काम फडणवीसांनी केले : सुजय विखे

माझ्या संकटाच्या काळात आधार देण्याचे काम फडणवीसांनी केले : सुजय विखे

मुंबई : माझ्या संकटाच्या काळात मला आधार आणि आशीर्वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे मी मुख्यमंत्री फडणवीस आणि सर्व आमदारांचे आभार मानतो असे उद्‌गार सुजय विखे पाटील यांनी आज भाजप प्रवेशाच्यावेळी काढले. 

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, राम शिंदे आणि नगर जिल्ह्यातील भाजपचे आजी माजी आमदार उपस्थित होते. सुजय विखे यावेळी म्हणाले की हा माझा व्यक्तिगत निर्णय असून मी हा निर्णय माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध घेतला आहे. माझ्या आई वडिलांची या निर्णयाबाबत किती सहमती आहे हे मला माहित नाही. नगर जिल्ह्यात आमदारांच्या मदतीने भाजपच्या वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करेन नगरच्या लोकसभेच्या दोन्ही जागा युतीकडे राहतील असा विश्‍वास मी देतो. 

आपल्या भाषणात ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षिततेसाठी अनेक प्रभावी निर्णय घेतले आहेत. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व हेच खरे नेतृत्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातील वाटचालीसाठी भाजप हाच योग्य पक्ष आहे असे माझे आणि माझ्या युवक सहकाऱ्यांचे मत झाले आहे, त्यातूनच आम्ही भाजपप्रवेशाचा निर्णय घेतला. अतिशय सन्मानपूर्वक आणि मुलगा म्हणून मला नेत्यांनी मला पक्षात जागा दिली आहे. आमदार कर्डिले यांचे मला पाच वर्षापासून आशीर्वाद आहेत. अन्य आमदारांनाही विनंती आहे की मी मागे जे बोललो असेन ते विसरून आपला मुलगा मानून कुटुंबात सहभागी करून घ्यावे. 

यावेळी स्नेहलता कोल्हे, शिवाजी कर्डिले, राम शिंदे, मोनिकाताई राजळे, मुरकुटे , बबनराव पाचपुते हे आमदार आणि नगर जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com