शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख सुहास दाशरथेंचा उद्या मनसेत प्रवेश

शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत शनिवारी (ता. 8) सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज येथे त्यांचा प्रवेश होणार आहे. नुकतीच सुहास दाशरथे यांनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेत त्यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचे स्वागत करत मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
suhas dashrathe will join mns tomorrow
suhas dashrathe will join mns tomorrow

औरंगाबाद: शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्क प्रमुख सुहास दाशरथे अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत शनिवारी (ता. 8) सकाळी साडेअकरा वाजता कृष्णकुंज येथे त्यांचा प्रवेश होणार आहे. नुकतीच सुहास दाशरथे यांनी मुंबईत जाऊन राज ठाकरे यांची भेट घेत त्यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेचे स्वागत करत मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली होती.

मुंबईतील मनसेच्या पहिल्या राज्यस्तरीय महामेळाव्यातच दाशरथे यांचा मनसेत प्रवेश होईल असे वाटत होते. परंतु राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार असल्यामुळे औरंगाबादेतच त्यांचा पक्षप्रेवश केला जाणार होता. पण राज ठाकरे यांचा दौरा अचानक रद्द झाला आणि दाशरथे यांचा प्रवेशही लांबला होता.

आता 9 फेब्रुवारी मुंबईत मनसेचा बांगलादेशा आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महामोर्चा निघणार आहे. या पार्श्‍वभुमीवर उद्या सुहाश दाशरथे यांचा पक्षप्रवेश देखील केला जाणार आहे. दाशरथे हे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.

शिवसेनेत 35 वर्ष काम करून, विविध आंदोलनाचे गुन्हे दाखल झाले तरी पक्षाकडून न्याय मिळाला नाही. शिवाय राज्यातील सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडत कॉंग्रेस-राष्ट्रवादी सोबत सरकार स्थापन केले. ही बाब शिवसैनिक म्हणून आपल्याला पटली नाही.

अशातच राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारत ठोस भूमिका घेतली. त्यामुळे भविष्यात त्यांच्यासोबत काम करायला आवडेल असे सांगत दाशरथे यांनी मनसे प्रवेशाला दुजोरा दिला. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील एक मोठा पदाधिकारी मनसेच्या गळाला लागल्यामुळे त्याचा कितपत फायदा निवडणुकीत होतो हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com