यंदा साखरेचे उत्पादन घटणार, पुढील वर्षी मात्र दुप्पट - हर्षवर्धन पाटील यांचा दावा

यावर्षी राज्यामध्ये साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 40 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचे साखर उत्पादन जे 93 लाख टन होते. यावर्षी ते घटून 55 लाख टन होण्याची शक्‍यता आहे असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येथे सांगितले
Sugar Production will decrese this year claims Harshwardhan Patil
Sugar Production will decrese this year claims Harshwardhan Patil

मुंबई : राज्यामध्ये साखरेचे उत्पादन मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 40 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. तर पुढील वर्षी हेच उत्पादन जवळपास दुप्पट वाढेल, असा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साखर परिषदेत केला आहे. तसेच ऊस उत्पादनामध्ये कमतरता आल्यामुळे राज्यातील 50 टक्के साखर कारखाने बंद अवस्थेत आहेत. ते सुरु करण्यासाठी सरकारने लवकरच अनुकूल धोरण आखणे गरजेचे असल्याचे, मत ही त्यांनी व्यक्त केले.

ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) च्या वतीने अंधेरी येथील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या साखर परिषदेत ते  प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेश सरकारचे ऊस मंत्री सुरेश राणा, केंद्रीय खाद्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव कमल दत्ता, कृषी खर्च आणि किंमत आयोगाचे (सीएसीपी) अध्यक्ष विजय पॉल शर्मा, एआयएसटीएचे अध्यक्ष प्रफुल विठलानी, नॅशनल फेडरेशन ऑफ कॉ-ऑपरेटीव्ह शुगर फॅक्‍टरीजचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे उपस्थित होते.

याप्रसंगी हर्षवर्धन पाटील म्हणाले, ''यावर्षी राज्यामध्ये साखरेचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 40 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. मागील वर्षी महाराष्ट्राचे साखर उत्पादन जे 93 लाख टन होते. यावर्षी ते घटून 55 लाख टन होण्याची शक्‍यता आहे. पण पुढील वर्षी राज्यातील साखर उत्पादन दुप्पट वाढेल आणि ते जवळपास 100 टन होणार आहे. महाराष्ट्र भारतामध्ये साखर आणि इथेनॉल उत्पादन करणाऱ्या प्रमुख राज्यांपैकी एक आहे.'' इथेनॉलचे उत्पादन केल्यामुळे भारतामध्ये होणारी कच्च्या तेलाची आयात कमी झाली आहे. ज्यामुळे देशाचे परकीय चलन वाढण्यास मदत झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उत्तर प्रदेशचे ऊस उत्पादन मंत्री सुरेश राणा म्हणाले, ''उत्तर प्रदेश सरकार साखर उत्पादन क्षेत्रामध्ये चांगले काम करत आहे. ज्यामुळे ऊस उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना खूप फायदा झाला आहे. कुशल नेतृत्वामुळे उत्तर प्रदेश भारतातील सर्वाधिक साखर आणि इथेनॉल उत्पादन करणारे राज्य बनले आहे. केंद्र सरकारने किमान विक्री किंमत आणि इथेनॉल च्या बाबतीत नवीन धोरणाचा अवलंब करून साखर उद्योगाला तोट्यात जाण्यापासून वाचवले आहे.'' या परिषदेत जाणकारांकडून येणाऱ्या सुचना आम्ही केंद्र सरकारसमोर मांडण्यात येतील, असे ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल विठलानी यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com