मराठा आरक्षण : सुरेश धसांनी केले मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडेंचे अभिनंदन

...
dhas-cm-munde
dhas-cm-munde

बीड : राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरविल्याने राज्यकर्त्यांसह कार्यकर्त्यांच्या  आनंदाला गुरुवारी भरते आले होते. अभ्यासपूर्वक अहवाल तयार करुन टिकणारे आरक्षण सरकारने दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत होता. भाजप आमदार सुरेश धस यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

गुरुवारी दुपारी न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख मंत्र्यांसह विधिमंडळाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले. यावेळी सुरेश धसही त्यांच्या समवेत होते. अभिवादन केल्यानंतर सुरेश धस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. समाजाचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न मार्गी लावण्याचे प्रमुख श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे धस म्हणाले.

यानंतर त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनाही पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सरकारने अभ्यासपूर्वक अहवालाच्या माध्यमातून आरक्षण दिले. तसेच न्यायालयातही भक्कम बाजू मांडल्याने आरक्षण मिळाल्याचे धस म्हणाले. यानंतर त्यांनी नेत्या आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांचाही सत्कार केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com