sudhir mungantiwar on state government | Sarkarnama

हे सरकार सहा महिन्यांतच पडेल!

संदीप रायपूरे/निलेश झाडे
सोमवार, 27 जानेवारी 2020

कोंडया महाराज देवस्थान समितीने मला मंदीर बांधकामासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी मागीतला. पण मी एक कोटी रूपयांचा निधी दिला.

गोंडपिपरी (चंद्रपूर) :  बऱ्याच तडजोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. सुरवातीला वाटल की आमदार म्हणून पुढील पाच वर्ष काम करताना आरामही करता येईल, पण मी आता आराम करणार नाही. कारण सहा महिन्यांनतर पुन्हा ताकतीनं विकासकामांचा झपाटा लावायचा आहे, असे म्हणत त्यांनी हे सरकार सहा महिन्यातच पडेल याकडे लक्ष वेधले

श्री. संत कोंडया महाराज जंयती महोत्सवानिमीत्त गोंडपिपरी तालुक्यातील धाबा येथे आले असताना ते बोलत होते. देवस्थान संस्थानचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती, भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, बबनराव पत्तीवार,
 सरपंच रोशनी अनमुलवार, बबन निकोडे, येग्गवार अरूण कोंडापे, बाबुराव बोमकंटीवार, स्वप्नील अनमुलवार, दिपक बोनगीरवार, राजु गोहणे यांची यावेळी उपस्थिती होती.

मुनगंटीवार यांनी धाबा गावाबाबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. मी आमदार असतांना धाब्यात आलो होतो. तेव्हा संस्थानच्या कार्यकर्त्यानी मला रूग्णवाहिकेची मागणी केली होती. मी ती तात्काळ मंजूर केली. यांनतर मागील वर्षी  कोंडया महाराज देवस्थान समितीने मला मंदीर बांधकामासाठी पन्नास लाख रूपयांचा निधी मागीतला. पण मी एक कोटी रूपयांचा निधी दिला, असे मुनगंटीवार म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख