आता मुनगंटीवार भडकले : मनेका गांधींनी फोनसाठी पन्नास पैसे खर्च केले असते तर माहिती दिली असती !

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्या पिलिभित मतदारसंघातील एका नरभक्षक वाघिणीला शार्पशूटर शाफत अली खान यांनीच गोळ्या घालून ठार केले तेव्हा तेथील वनविभागाने शाफत अली खान यांचे प्रमाणपत्र पाठवून अभिनंदन केले होते याची आठवण मुनगंटीवर यांनी करून दिले. देशातील 9 राज्यात शाफत अली खान यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे असा दाखला त्यांनी दिला.
Menka-Vs-Mungantivar.
Menka-Vs-Mungantivar.

मुंबई:   "मनेका गांधी यांनी जाहिरपणे भाष्य करण्यापूर्वी मला पन्नास पैसे खर्च करून फोनवरून माहिती घेतली असती तर बरे झाले असते. याप्रकरणाची मनेका गांधी यांनी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी करावी," अशा शब्दात महाराष्ट्राचे वन -पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी  थेट केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनाच आव्हान दिले आहे . 

यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनक्षेत्रपरिसरात अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी ट्विटरवरून महाराष्ट्राच्या वन्यमंत्र्याना खडसावले होते आणि  सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्याला वनमंत्री म्हणून नियुक्तच कसे करतात असा सवाल केला होता . 
 या वाघिणीला शुक्रवारी रात्री खासगी शार्पशूटरच्या मदतीने ठार करण्यात आले.  अवनीच्या हत्येनंतर  केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही जाहिरपणे ट्विट करीत अवनीला गोळ्या घालणे म्हणजे ती एकप्रकारे हत्याच असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कमालीच्या संतापल्या होत्या. 

एवढेच नव्हे तर अवनीला मारण्यासाठी एका गॅंगस्टरला बोलावल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मनेका गांधींच्या या आरोपामुळे अस्वस्थ झालेल्या मुनगंटीवार यांनी आज पत्रकार परिषदेत वनविभागाची बाजू मांडली.श्री .  मुनगंटीवार म्हणाले ," अवनी    ही काही वन्यकर्मचायांची शत्रू नव्हती. तीला ठार मारण्याचा त्यांचा उद्देशही नव्हता. अवनीला बेशुध्द करण्याचे इंजेक्‍शन मारण्याचा प्रयत्न केला पण वाघिणीने हल्ला केला म्हणून शेवटी गोळी घातल्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही."

 " माझ्या कार्यकाळात मी कधीही वाघाला मारण्याचे आदेश दिलेले नाहीत. 2017 मध्ये एका वाघाला बेशुद्ध करून जेरबंद केले होते. मंत्री किंवा सचिवाला वाघाला मारण्याचे आदेश देण्याचा अधिकार नसतो.13 जणांचा बळी घेणा-या या अवनीला गोळी घालून ठार मारण्यापूर्वी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचा अवलंब केला होता. त्यामुळे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा कोणत्याही पातळीवर चौकशी करा, पण वन कर्मचा-यांचे मनोबल खच्ची करू नका. वन कर्मचारी हे व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचे काम करीत आहेत," असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com