sudhir mungantiwar file defemation suit | Sarkarnama

अंगावर आलेल्या संजय निरूपमांना मुनगंटीवारांनी शिंगावर घेतलेच!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

मुनगंटीवार यांनी चंद्रपूर न्यायालयात त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला.

चंद्रपूर : "अवनी' वाघीण प्रकरणात आंतरराष्ट्रीय तस्करीचा आरोप करणारे कॉंग्रेस नेते संजय निरूपम यांच्याविरोधात राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी (ता. 13) चंद्रपूर न्यायालयात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला.

यवतमाळ जिल्ह्यात "अवनी' वाघिणीला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य केले. अनेकांनी या प्रकरणात त्यांना आरोप केले. संजय निरूपम यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी वनमंत्री म्हणून मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात झालेल्या वाघांच्या मृत्यूची यादीच दिली. सोबतच आंतरराष्ट्रीय तस्करांसोबत त्यांचे सबंध असल्याचा खळबळजनक आरोपही केला. त्याचवेळी मुनगंटीवार यांनी निरूपम यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करणार असे सांगितले. दरम्यान, आज मुनगंटीवार यांनी चंद्रपूर न्यायालयात त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला. याअंतर्गत दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख